कल्याण: रिपब्लिकन ऐक्याच्या मुद्द्यावरून पीआरपीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर हे रिपब्लिनक नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही, असं प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटलं आहे.
कल्याणच्या शासकीय निवासस्थान येथे सम्राट या सिनेमाच्या मुहूर्तासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे आले होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला असता हे विधान केलं. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्व रिपब्लीकन गटांनी एकत्रित येऊन निवडणूका लढल्या पाहिजेत. आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, असं कवाडे म्हणाले. त्यावर, वंचितचे नेते प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे की नाही? असा सवाल कवाडे यांना विचारला असता, प्रकाश आंबेडेकर हे स्वत:ला रिपब्लिकन मानत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासोबत रिपब्लिकन ऐक्याची चर्चा होऊ शकत नाही. रामदास आठवले यांच्यासह राज्यस्तरीय नेत्यांसोबत आमची ऐक्याची चर्चा सुरू आहे, असं कवाडे यांनी स्पष्ट केलं.
यावेळी कवाडे यांनी ओबीसी आरक्षण, मुस्लीम आरक्षण आणि सध्याच्या राजकारणात सुरू असलेली कमरेखालची टीका यावर भाष्य केले. कल्याणमध्ये सम्राट चित्रपटासाठी ऑडिशन सुरु होणार आहे. कलाकारांनी ऑडिशन द्यावे. मराठी चित्रपट आणि कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन कवाडे यांनी केले.
ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी आमच्या पक्षाकडून सातत्याने प्रयत्न सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे इम्पिरिकल डाटा मागितला आहे. त्यासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना राज्य सरकारने केली आहे. इम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या कामाकरीता राज्य सराकरने 435 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. येत्या तीन महिन्यात हा डाटा गोळा करुन न्यायालयात सादर केला जाणार आहे. त्यानंतर हा प्रश्न सूटू शकतो, असं कवाडे यांनी सांगितलं.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाला शिक्षणात 5 टक्के आरक्षण मिळायला हवे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने सूचना केली आहे. मात्र सरकार याकडे का लक्ष देत नाही हा आश्चर्याचा विषय आहे. शैक्षणिक दृष्टय़ा मागास असलेल्या मुस्लीम समाजाला शिक्षणात तरी पाच टक्के आरक्षण कायम ठेवले जावे अशी आमच्या पक्षाची मागणी आहे, असं ते म्हणाले.
ब्राह्मण हा समाज पूर्वीपासूनच आरक्षित आहे. शासन असो की प्रशासन त्यात ब्राह्मण समाज आहे. पूर्वीपासून प्रत्येक राजवटीत त्यांनाच फायदा मिळाला आहे. त्यामुळे त्यांनी आरक्षणाची मागणी करुन आरक्षणाची चेष्टा करुन नये, असा सल्ला त्यांनी आरक्षण मागणाऱ्या ब्राह्मण संघटनांना दिला आहे.
राजकारणात एकमेकांवर कमरेखाली वार केले जात आहेत. त्यावरही त्यांनी टीका केली. राजकारणात शत्रूत्व निर्माण होणार नाही. लोकशाहीच्या सभ्यतेला धक्का पोहोचणार नाही असं नेत्यांनी, मंत्र्यांनी वागले पाहिजे अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. अनेक प्रकारचे विरोध सहन करुन आमचा पक्ष काम करीत आहे. काल परवा म्यॉव म्यॉव झाले, पंतप्रधानांवर टीका केली गेली. टीका करा पण पातळी ढासळू नये. असभ्यतेने वागून टीका करा. कमरेखालची राजकीय टीका नको, असा सल्लाही त्यांनी दिला.
VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 26 December 2021https://t.co/GYmfswHcd8 | #AjitPawar | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 26, 2021
संबंधित बातम्या:
Video : अजित पवारांच्या गाडीचे सारथ्य महिलेकडे, कोण आहे ही रणरागिणी? वाचा सविस्तर
शेतकऱ्यांचे शहाणपण : रान रिकामे राहिले तरी चालेल, पण फरदड उत्पादन नको रे बाबा, काय आहे फरदड पीक?