ठाणे: ईडीकडून होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मोठं विधान केलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या भांडणात आमचा बळी जात आहे, असा घरचा आहेरच प्रताप सरनाईक यांनी राज्य सरकारला दिला आहे. (pratap sarnaik reaction on ED action on maha vikas aghadi leader)
प्रताप सरनाईक यांनी मीडियाशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणामुळे आमचा बळी जात आहे हे मी पूर्वीपासून सातत्याने मीडिया समोर बोलत आलो आहे. मग प्रताप सरनाईक असो की अन्य कोणी? आरोप-प्रत्यारोप होत असतात. विरोधक त्यांचे काम करत असतात, असं सांगतानाच मी किरीट सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा दावा दाखल केला आहे. ते चुकीचा मेसेज पसरवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर दावा केला आहे. आमचा न्यायालयावर विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेल, असं सरनाईक म्हणाले.
आम्ही राजकारण करत असताना राजकीय पक्षांना अंगावरही घेतो. मात्र त्यात कुणाच्या कुटुंबीयांना आणत नाही. आता आमच्या कुटुंबीयांवरही घाव घातला जात आहे. त्यांनाही प्रकरणांमध्ये गोवले जात आहे. त्याचा कुटुंबीयांना त्रास होत असतो, असं त्यांनी सांगितलं.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही गणेशोत्सव साजरा करत आहोत. इको फ्रेंडली मूर्तीच्या माध्यमातून पर्यावरण पूरक असा गणेश उत्सव आम्ही सहकुटुंब साजरा करतो. जगातून, राज्यातून आणि शहरांतून लवकरात लवकर कोरोना नाहीसा होवो अशी मागणी गणरायाकडे मागणी केली आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मंदिरे उघडावी ही सर्वसामान्यांची इच्छा आहे. अनेकांची देवावर श्रद्धा आहे. तुमची देवावर श्रद्धा आहे मग मुख्यमंत्र्यांची श्रद्धा नाही का? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांची ईश्वरावर प्रचंड श्रद्धा आहे. परंतु, अशा संकटात मंदिरे उघडली तर तिसऱ्या लाटेला आयतच निमंत्रण मिळेल. त्यामुळे देव्हाऱ्यात देवाची पूजा करावी. मंदिरे उघडण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी, असं सांगतानाच आज ना उद्या शाळाही उघडतील. याबाबत सरकार आणि लवकर तोडगा काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्द्यावरही भाष्य केला. 12 आमदारांचा प्रश्न हा राज्यपालांकडे आहे. त्याचबरोबर या प्रकरणात कोर्टाने हस्तक्षेप केला आहे. कोर्टाने तसं मत देखील मांडलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यपाल 12 आमदार नियुक्ती बाबत विचार करतील अशी आशा आहे, असंही ते म्हणाले.
ना ढोलताशांचा दणदणाट… ना गुलालांची उधळण… ना भव्यदिव्य मिरवणुका… मात्र, तरीही गणपती बाप्पा मोरया… मोरया रे बाप्पा मोरया रे… अशा घोषणा देत विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झालं. राज्यभर रस्त्यांवरून गणेश मूर्त्या घेऊन जाताना गणेश भक्त दिसत होते. मात्र, रस्त्यावर नेहमीसारखी गर्दी नसली तरी उत्साह मात्र कायम होता. यावेळी गणेश भक्तांनी कोरोना नियमांचं पालन करत उत्साहात गणरायाच्या मूर्तीची घरी आणि मंडपात प्रतिष्ठापना केली. (pratap sarnaik reaction on ED action on maha vikas aghadi leader)
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 10 September 2021https://t.co/Ha7WGja4QD
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 10, 2021
संबंधित बातम्या:
Ganesh Chaturthi 2021 | गणेश चतुर्थी आज, जाणून घ्या गणपती स्थापनेचा शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2021 | महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचं आज आगमन, भाविकांमध्ये मोठा उत्साह
(pratap sarnaik reaction on ED action on maha vikas aghadi leader)