ठाणे : बालाजी किणीकर हे ठाण्यातील अंबरनाथ आमदार. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेसच्या रोहित साळवे यांचा पराभव केला. त्यापूर्वी २००९ आणि २०१९ ला ते आमदार होते. सलग तिसरी टर्म ते आमदार आहेत. सर्व काही बरोबर असताना महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे बाहेर पडले. तेव्हा किणीकर यांनी शिंदे यांची साथ देण्याचे ठरवले. ठाकरे गटाने शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या १६ आमदारांनी अपात्र करण्यात यावे, अशी याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली. आता अंतीम निकाल थोड्या वेळात येणार आहे. त्यामुळे बालाजी किणीकर कोण आहेत. त्यांचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता त्यांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आला आहे.
बालाजी किणीकर हे शिवसेनत सक्रिय आहेत. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्यावर काही राजकीय गुन्हे दाखल करण्यात आले. उल्हासनगरमध्ये पाण्याची समस्या होती. त्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंत्याविरोधात मोर्चा काढला. शासकीय कार्यालयाची तोडफोड केली. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल झाला.
ठाकरे आणि शिंदे गट वेगळे झाले. त्यावेळी किणीकर यांनी शिंदे यांची साथ देण्याचे ठरवले. या शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र का करण्याठी येऊ नये, यासाठी ठाकरे गट कोर्टात गेले. त्यावरचा निकाल सकाळी ११ वाजता लागणार आहे. त्यामुळे बालाजी किणीकर यांची आमदारकी जाणार की, राहणार याचा फैसला लवकरच होणार आहे.
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात म्हणजे सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे. या निकालात १६ आमदार अपात्र होणार की नाही, याचाही निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या सोळा आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, यामिनी जाधव, चिमणराव पाटील, भरत गोगावले, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोरणारे आणि बालाजी कल्याणकर यांचा समावेश आहे.