मुंबई : गुढी पाडव्याच्या शिवतीर्थावरील सभेनंतर आज राज ठाकरेंची (Raj Thackeray Thane Speech) ठाण्यातही वादळी सभा पार पडलीय. शिवतीर्थावरूनही राज ठाकरेंनी हिंदुत्वावरून (Hindutva) चौफेर बॅटिंग केली होती. तर मशीदीवरील भोंग्यावरही (Masjid Loude Speaker) जोरदार हल्लाबोल चढवला होता. त्यानंतर मशीदीवरील भोंगे उतरले नाही तर मशीदीसमोर हनुमान चालीसा लावा, असे आवाहन राज ठाकरेंनी केलं होतं.राज ठाकरेंच्या या भूमिकेवरून जोरदार टिकाही झाली. मात्र या सभेनंतर हिंदु्त्वाची भूमिका घेल्याने भाजपसहीत एक मोठा वर्ग खूशही आहे. त्यामुळे राज ठाकरेंची आजची सभा पार काश्मीरपर्यंत दाखवण्यात आली. काश्मीरमध्येही राज ठाकरेंच्या या सभेचे स्क्रीन लावून लाईव्ह प्रदर्शन करण्यात आले. या सभेला फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यातून लोकं आल्याचेही सांगण्यात आले. असाच राज ठाकरेंचा आणि हनुमानाचा एक फक्त भाषण ऐकायाला आयोध्येवरून आला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
आयोध्येतून आलेला हा हनुमान भक्त फक्त सभेसाठी नव्हता आला तर तो चक्क हनुमानाची वेशभूषा धारण करून, हनुमान बनुनच सभेला आला होता. मात्र त्यालाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली. सभेच्या आधीच पोलिसांनी याला ताब्यात घेतल्याने त्याला राज ठाकरेंचं भाषणही ऐकता आलं की नाही, याबाबतही शंकाच आहे. पालघर वरून महाराष्ट्र सैनिक तुलसी जोशी यांनी याला हनुमान वेशभूषेत आणले होते. तो राज ठाकरे यांचा चाहता आहे त्याला देखील भाषण ऐकायचे होते, मात्र या कारवाईने त्यांच्या आनंदावर विर्जन पडले आहे.
मी आयोध्येवरून आलो आहे. मी राज ठाकरेंचा मोठा फॅन आहे. त्यांना ऐकायला मी इथे आलो आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्याने आम्हाला ते बाळासाहेब ठाकरेंचं दुसरं रुप वाटतं, अशी प्रतिक्रिया या राज ठाकरेंच्या फॅनने दिली होती. तर याला राज ठाकरेंच्या मशीदीवरील भोंग्याबाबत विचारले असता, राज ठाकरेंनी दिलेल्या घोषणेला आमचं पूर्ण समर्थन आहे, आम्ही त्यामुळे खूश आहोत, असे तो यावेळी म्हणाला आहे.