ठाणे : मराठी भाषा (Marathi Language) थोर आहे. अमृताचे पैजाही जिंकणारी आहे. अमृताचे पैजा जिंकणारी ही भाषा तितकीच हलकी फुलकी आणि लवचिक आहे. या भाषेचं सामर्थ्यही मोठंच आहे. मात्र या भाषेचा लवचिकपणा किती आहे, हे आज पुन्हा अधोरेखित झालं आहे. राज ठाकरेंच्या भाषणात संजय राऊत यांच्यावर बोलताना एक शब्दप्रयोग केला. हा शब्दप्रयोग आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी वापरलेला होता, असंही राज ठाकरे (Raj Thackeray Thane Speech) यांनी म्हटलं. या शब्दात असलेल्या एका अनुस्वाराची किंमत राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातही नमूद केली. हा शब्द होता, ल वं डे! लवंडे म्हणजे काय? अस जर तुम्ही गुगलवर (Google) सर्च कराल, तर तुम्हाला त्याचा अर्थ मिळणार नाही. लवंडे हा शब्द मोबाईल ऍपच्या डिक्शनरीतही नाही.
या शब्दाचा अर्थ खरंतर राज ठाकरे यांनी राजकीय संदर्भासह स्पष्ट केला होता. त्यामुळे लवंडे शब्दाचा अर्थ जाणून घेण्यापासून त्याचा संदर्भही जाणून घेणं गरजेच आहेच! दरम्यान, राज ठाकरे यांनी फक्त लवंडे हा एकच शब्द वापरला नाही. त्यांनी याशिवायही आणखी एक शब्दप्रयोग केला. या शब्दप्रयोग नेमका काय होता, याचीही चर्चा रंगली आहे.
संजय राऊत यांना ईडीची नुसती एक नोटीस आली तर ते पत्रकार परिषदेत पातळी सोडून बोलले असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. एखाद्या वर्तमानपत्राच्या संपादकाची भाषा किती खालच्या थराची आहे, याचा उल्लेख राज ठाकरे यांनी ते शब्दप्रयोग करुन लक्ष वेधून घेतलं. मात्र याचवेळी त्यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या ठेवणीतला एक शब्द वापरुन टोलाही लगावला आहे.
राज ठाकरे यांनी म्हटलंय की,..
हे शिवसेनेचे की राष्ट्रवादीचे?
माझ्या आजोबांनी एक शब्द काढलाय यावर.. ल वं डे
व वर अनुस्वार आहे!म्हणजे काय तर पूर्वी पत्रकार आपल्याकडे जेवायचे.. शिवसेनेकडून पडलं की शिवसेनेकडे.. राष्ट्रवादीकडून पडलं की राष्टरवादीकडे… असे हे लवंडे…
लवंडे हा शब्दाचंच पुढे जाऊन लवंडायचं, एखाद्या बाजूला झुकायचं, अशा अर्थानं राज ठाकरे यांनी वापरला आहे. फक्त या एका शब्दावर राज ठाकरे थांबले नाहीत. याआधीही त्यांनी आपल्या भाषेवरील प्रभुत्वाचाही नमुना दाखवला. जयंत पाटील यांच्यावर बोलताना राज ठाकरेंनी आपल्या खुमासदार शैलीतून उत्तर दिलं. जयंत पाटील यांचा उल्लेख जंत पाटील म्हणून राज ठाकरेंनी केलाच. शिवाय संपलेला पक्ष म्हणून ज्यांनी ज्यांनी मनसेवर टीका केली, त्यांनाही आपल्या राज ठाकरेंनी उत्तर दिलंय..
म्हणे विझलेला पक्ष आहे, असं म्हणणाऱ्या जंतराव. हा विझलेला पक्ष नाहीये, हा समोरच्यांना ‘विझवत’ जाणारा पक्ष आहे. माझ्या अक्षरांवर थोडंसं इकडे तिकडे झालेलं असेल तर बघून घ्या.
ठाण्यातील सभेत राज ठाकरेंनी आपल्या वत्कृत्व शैलीची छाप पाडली. शिवाय भाषेवरील आपली पकड घट्ट असल्याचं दाखवून दिलं. राज ठाकरेंच्या ठाण्यातील भाषणात नेहमीप्रमाणे यावेळीही चतुराईनं शब्दांचा वापर करत श्रोत्यांची मनं जिंकली.
Raj Thackeray Speech : राज ठाकरेंची सभा ऐकायला आलेला “हनुमान” पोलिसांच्या ताब्यात, कारण काय?
Vasant More Speech : आतापर्यंत कितीवेळा वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आलेत? जाणून घ्या!