राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं

| Updated on: Dec 11, 2022 | 9:33 PM

आजपासून 10 कुटुंबीयांना भेटायला सुरवात करा. आपल्याला नक्कीच उपयोग होईल.

राज ठाकरे यांना समजायला वेळ लागले, अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना सुनावलं
अभिजित पानसे
Follow us on

निखिल चव्हाण, प्रतिनिधी, टीव्ही ९ मराठी, ठाणे : मनसेचे अभिजित पानसे म्हणाले, इथे यायला वेळ झाला. तोपर्यंत हल्ली पैसे घेऊन भाषण आणि गाणी गातात, त्यांना बोलावायला पाहिजे होते. पहिले त्या असतील त्या कपात पाणी पितात. नंतर सांगितल्याप्रमाणे भडाभडा बोलायचं काम करत आहेत. मी एकेरी भाषेत बोलत नाही. ती माझी संस्कृती नाही. ताईंना मी सांगू इच्छितो. सूर्यावर थुंकण्याचा प्रकार करत आहेत, ते चुकीचं आहे. तुम्हाला राज ठाकरे कळायला वेळ लागेल. पण जेव्हा वेळ येईल तेव्हा तुम्ही पक्षात प्रवेश करण्यासाठी शिवतीर्थ बाहेर असालं. असा टोलाही अभिजित पानसे यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.

अभिजित पानसे म्हणाले, गेले अनेक वर्षे विकास या कामावर बोलणारे एकच नेते आहेत ते म्हणजे राज ठाकरे. भूमिपुत्रांविषयी आपल्याला असलेला कळवला हा काल सांगितलं आहे. आपली युती ही अनेक लोकांना खुपणार आहे.

राज ठाकरे आणि मनसे मोठे झाले तर, ह्याचे काळे धंदे चालणार नाही अशी त्यांना भीती वाटते. आपण फक्त झेंडे आणि फोटो काढायला नाहीत. आज महाराजांचे विषयी अपमान करणारे येवढी मोठी लायकी कोणाची नाही, असंही पानसे यांनी सांगितलं.

राज्यपाल अश्याप्रकारचे विधान करत आहेत. खोटा प्रचार करणारे अनेक लोक आहेत आणि ते सोडलेले आहेत. राज ठाकरे यांना मिळालेला प्रतिसाद हा आजचा नाही तो आधीपासूनचा आहे.

आजपासून 10 कुटुंबीयांना भेटायला सुरवात करा. आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आजच ढवळलेला राजकारण आपण बदलू शकतो आणि ते नीट करू शकतो, असा सल्लाही अभिजित पानसे यांनी दिला.