ठाणे : काही दिवसापूर्वी एका रॅपरने स्वतः केलेला रॅप पोस्ट करत सोशल मीडियावर प्रचंड धूमाकूळ घातला होता. त्यानंतर ते रॅप प्रचंड व्हायरल झाले होते. त्या प्रकरणीच त्याच्या पोस्टनंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला सोडवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी प्रयत्न केले होते. मात्र पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नसल्याने आता त्याच्या भावाने राजकीय नेत्यांची मदत घेऊन माझ्या भावाचा शोध लागत नसल्याचे सांगत भावनिक साद घातली आहे. संभाजीनगरमधील तरुण रॅपर राज मुंगासे याने काही दिवसापूर्वी रॅप केले होते. त्या रॅपमधून राजकीय टीकी टिप्पणी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता.
त्या प्रकरणीच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यावरून आता राजकारण तापले असून राज मुंगासे यांच्या कुटुंबीयांनी थेट आमदार जितेंद्र आव्हाड यांना मोबाईलवरून संपर्क साधून राज मुंगासे याच्या भावाने राज बेपत्ता असल्याचे म्हटले आहे.
त्यामुळेच आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारकडे त्याचा लवकर शोध घेऊन त्याची माहिती राज मुंगासे याच्या कुटुंबीयांना द्यावी अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.
संभाजीनगरमधील तरुण रॅपर राज मुंगासे याने काही दिवसांपूर्वी एक रॅप करत सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तो रॅप त्यानंतर राज्यभरात प्रचंड व्हायरलही झाला.
राज मुंगासे हा रॅपर ज्या दिवसापासून त्याचे गाणे सोशल मीडियावर आले, त्याच्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये आली. पण, तो कुठे आहे? कोणत्या पोलीस स्टेशनला आहे? हे मात्र त्याच्या घरच्यांना माहीत नाही. घरच्यांनी मला निरोप पाठवला असून त्यामध्ये त्यांच्या… pic.twitter.com/QfMzneVSQk
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 10, 2023
तसेच राज मुंगासेचा त्या रॅपचा व्हिडीओही आमदार जितेंद्र आव्हाड यांनीदेखील ट्विट केला होता. मात्र त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर राज मुंगासेवर पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले होते.
मात्र आता त्याच्या कुटुंबीयांनी तो काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे त्याच्या भावाने आव्हाडांना मेसेज करून कळवले आहे. त्यामुळे आता संभाजीनगरमधील पोलीस म्हणत आहेत की मुंबईमध्ये अटक आहे तर मुंबईमध्ये विचारपूस केल्यानंतर मुंबई पोलीस सांगत आहेत की, स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे.
राम मुंगासे या नवोदित कलाकाराने एक गाणं म्हटलं म्हणून त्याच्या घरातून संभाजीनगर पोलीसांनी त्याला अटक केली व ते त्याला अंबरनाथ पोलीसांच्या हाती देतील. पण, त्याचा गुन्हा काय ? त्याने तर कोणाचे नाव देखिल घेतले नव्हते. 50 खोके हे कोणाचे नाव आहे का हे आधी पोलीसांनी स्पष्ट करावं. 50… pic.twitter.com/9IOz4XUZ5X
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 6, 2023
पोलिसांचा हा सर्व प्रकार मुंगासेच्या भावाने आव्हाड यांना मेसेज करून कळवला आहे.त्यामुळे आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत या सर्व प्रकाराबाबत पोलिसांनी गांभीर्याने दखल घ्यावी व त्वरित शोधकार्य करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.तसेच मुंगासे कुटुंबीयांना राजची माहिती द्यावी असंही ट्विटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, प्रत्येक क्रांतीचा जनक आणि त्यांना लोकांपर्यंत घेऊन जाणारी लोकं गायक आणि कवीच असतात.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्येही अण्णाभाऊ साठे यांची गाणी आणि त्यांच्या डफ वरती वाजलेला होता हे कोणीच विसरू शकत नाही. त्याकाळी शाहीर जे होते त्यांनी ही चळवळ पेटवली होती. त्यामुळे अशा चळवळीमध्ये आग ओकण्याचे काम करत होते पूर्वी डफ होता आता रॅप आले.
त्यामुळे एकाही रॅपरने कोणाचे नाव घेतले नाही. प्राप्त परिस्थितीनुसार प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्या बाबतीत जे झाले आहे ते लोकशाहीला धरून नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे पायदळी तुडवले जात असल्याची टीका करत आम्हाला संविधानाने हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सरकारला सुनावले आहे.