Dombivali : रंग परिवर्तन झालेला दुर्मिळ पिवळ्या पोपटाचे डोंबिवलीकरांना दर्शन, नैसर्गिक बदलामुळे…

| Updated on: Feb 07, 2023 | 12:40 PM

वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी विरळ होत चाललेले आहेत. वनराईतील डेरेदार वृक्ष नष्ट झाल्याने पोपटांचे आसरे नाहीसे झाले. परिणामी लाल चोचीच्या गावरान पोपटाचे मिठू मिठू आणि त्याचे मनोहारी दर्शन अलीकडच्या काळात दुरापास्त झाल्याचे चित्र आहे.

Dombivali : रंग परिवर्तन झालेला दुर्मिळ पिवळ्या पोपटाचे डोंबिवलीकरांना दर्शन, नैसर्गिक बदलामुळे...
yellow bird
Image Credit source: tv9marathi
Follow us on

डोंबिवली : बदलत्या वातावरणाचा (climate change) परिणाम फक्त मनुष्यावरती होतोय असं काही नाही, त्याचा परिणाम सगळ्या गोष्टींवर होत असल्याचं वारंवार दिसून आलं आहे. शहरात अनेक पक्षी (the bird) दिसणं दुर्मिळ झालं आहे. मोजके प्राणी शहरात दिसत असल्याचं अनेकदा सांगितलं जातं. विशेष म्हणजे बदलत्या वातावरणाचा खरा फटका पक्षांना बसला आहे. मागच्या वर्षभरापुर्वी डोंबिवलीत (Dombivali) पांढरा कावळा दिसून आला होता. त्यानंतर आता डोंबिवलीकरांना पिवळ्या पोपटाचे दर्शन झाले आहे.

साधारण वर्षभरापूर्वी डोंबिवलीत पांढऱ्या कावळा आढळून आला होता, त्यानंतर आता चक्क पिवळा रंगचा पोपट आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा लव्हबर्ड किंवा परदेशी पोपट नाहीतर आपल्या देशातील रोझ रिंग पॅराकीट प्रजातीतील आहे. रोझ रिंग पॅराकीट म्हणजे हिरवा रंगाचा आणि लाल चोच असलेला पोपट, आपण हे पोपट नेहमीच आपण पाहतो. मात्र आज आढळलेला पोपटचा रंग चक्क पिवळा आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे पक्षी विरळ होत चाललेले आहेत. वनराईतील डेरेदार वृक्ष नष्ट झाल्याने पोपटांचे आसरे नाहीसे झाले. परिणामी लाल चोचीच्या गावरान पोपटाचे मिठू मिठू आणि त्याचे मनोहारी दर्शन अलीकडच्या काळात दुरापास्त झाल्याचे चित्र आहे. झपाट्याने होणाऱ्या नैसर्गिक बदलांचे हे द्योतक पक्षीमित्रांसाठी चिंतेचा विषय ठरत असताना महानगरपालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या पत्रकार कक्षाच्या खिडकीत सोमवारी सकाळी एक पूर्ण पिवळ्या रंगाचा पोपट आढळून आला. घाबरुन हा पोपट खिडकिच्या जाळीवर आला होता, याची माहिती प्राणी-पक्षी मित्र आणि पॉझ संस्थेचे निलेश भणगे यांना दिली आणि त्यांनी तात्काळ पोपटाची सुटका करत त्याला ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा