अंबरनाथ : दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या ओमिक्रॉन (Omicron Suspects in Maharashtra) या कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर देशभरात धाकधूक वाढली आहे. कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचं गुरुवारीच समोर आलं. महाराष्ट्रात अद्याप ओमिक्रॉनचे रुग्ण सापडले नसले, तरी परदेशगमन करुन आलेल्या प्रवाशांबाबत सतर्कता बाळगली जात आहे. विशेषतः कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांबाबत प्रशासन हाय अलर्टवर आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात कुटुंबासह परदेशात जाऊन आलेली सात वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
रशियाहून अंबरनाथला परतलं कुटुंब
संबंधित बालिका आई वडिलांसह रशियाला फिरण्यासाठी गेली होती. 28 नोव्हेंबरला हे कुटुंब रशियाहून अंबरनाथला परतलं. त्यानंतर काही दिवसात मुलीला त्रास होऊ लागल्यानं टेस्ट केली असता ती कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झाले. मुलीचे वडील निगेटिव्ह असून तिच्या आईच्या कोरोना चाचणीचे अहवाल येणं अद्याप बाकी आहे. विशेष म्हणजे मुलीची आई दोन दिवस ऑफिसलाही जाऊन आल्याचं उघड झालं आहे.
इमारत सील करणार
कोरोना पॉझिटिव्ह मुलीचे नमुने ओमिक्रॉन तपासणीसाठी आज लॅबला पाठवणार असल्याची माहिती मिळत आहे. सध्या मुलगी आणि तिचे कुटुंबीय घरीच क्वारंटाईन झाले असून त्यांची इमारत सील करणार असल्याची माहिती पालिकेनी दिली आहे.
महाराष्ट्रात टेंशन का?
महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. हे सर्व संशयित मुंबई, पुणे, ठाणे ह्या महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या शहरांमध्ये आहेत. तशीच ही तीनही शहरं गर्दीची आहेत. संशयितांपैकी एकट्या मुंबईत 10 जण आहेत तर इतर 18 जण हे विविध शहरांतील आहेत. हे सर्व जण गेल्या महिन्याभरात परदेशातून महाराष्ट्रात आलेले आहेत. यातले 25 जण हे परदेशी प्रवास करुन आले आहेत, तर तिघे जण हे त्यांच्या संपर्कातील आहेत. या सर्वांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांची ओमिक्रॉनची एस जिन चाचणीही करण्यात आली आहे. त्याचा रिपोर्ट पुढच्या आठवड्यापर्यंत हाती येण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
बोगसगिरी ! ओमिक्रॉनचा पहिला पेशंट सापडला आणि तो दक्षिण आफ्रिकेला पळालाही, नेमका कसा?
मुंबई, पुणे, ठाण्याचं टेन्शन वाढलं, महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 28 संशयित, 48 तास महत्वाचे
Lockdown Again In India? | ओमिक्रॉनमुळे भारत पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?