कल्याण : अंतराळ क्षेत्राविषयी अधिकाधिक माहिती जाणून घेण्याकडे तरुण-तरुणींचा कल वाढला आहे. याच उत्सुकतेतून काही जण मग अंतराळ मोहिमांमध्ये सहभागी होण्याचा निर्धार करतात. कल्याणच्या तरुणीने असाच निर्धार करून चक्क अमेरिकेमध्ये महाराष्ट्राबरोबर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. संजल गावंडे असे या मराठमोळ्या तरुणीचे नाव असून तिने अमेरिकेमध्ये अंतराळात झेपावणारे ‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान बनवणाऱ्या टीममध्ये स्थान पटकावले आहे. ती कल्याण पूर्वेकडील रहिवाशी आहे. तिच्या या कामगिरीबद्दल तिचे सर्वच स्तरांतून भरभरून कौतुक केले जात आहे. (Sanjal Gawande’s Great success; A place in the private spacecraft team in the United States)
अमेरिकेमधील ‘ब्ल्यू ओरिजिन’ या स्पेस कंपनीने अंतराळ सफरीची घोषणा केली आहे. या अंतराळ सफरीमध्ये संजल गावंडेने स्वतःला सिद्ध केले आहे. येत्या 20 जुलैला ‘ब्ल्यू ओरिजिन’ कंपनीतर्फे ‘न्यु शेफर्ड’ हे खासगी यान जगप्रसिद्ध ब्रँड अमेझॉनचे संस्थापक आणि ब्ल्यू ओरिजिन कंपनीचे मालक जेफ बेझोस यांच्यासह काही मोजक्या पर्यटकांना घेऊन अंतराळात झेपावणार आहे. हे यान बनवणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये संजलचा समावेश आहे. कल्याणकर संजलने इंजिनीअरीगचे शिक्षण पूर्ण केली आहे. त्यानंतर विविध परीक्षा देत तिने इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करीत आता अंतराळ सफरीमध्ये झेप घेतली आहे. तिने कल्याण शहराची पताका थेट अंतराळात फडकवली आहे. तिच्या या यशामुळे कुटूंबियांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. मुलीचे हे यश आपल्याला गगनात मावेनासा आनंद देत असल्याची प्रतिक्रिया संजलच्या आई-वडिलांनी दिली आहे.
संजल ही कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरातील रहिवाशी. तिची आई सुरेखा गावंडे या एमटीएनएलच्या कर्मचारी, तर वडील अशोक गावंडे हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवृत्त कर्मचारी आहेत. मुलीने अत्यंत अतिशय कठीण परिस्थितीत हे यश मिळवले आहे, असे संजलच्या आई सुरेखा गावंडे यांनी सांगितले. संजलला कल्पना चावला आणि सुनीता विलियम्स यांच्यासारखी अंतराळात भरारी घ्यायची आहे. हे तिचे स्वप्न आहे आणि ते ती पूर्ण करणार, असा विश्वास संजलच्या वडिलांनी व्यक्त केला आहे.
‘न्यू शेफर्ड’ हे खासगी यान आहे. अंतराळ क्षेत्रात ‘न्यू शेफर्ड’ अंतराळ सफरचे लाँचिंग म्हणजे एक मैलाचा दगड मानला जात आहे. या यानातून प्रवास करण्यासाठीची किंमत तब्बल 28 मिलियन डॉलर इतकी आहे. हे रॉकेट डिझाईन करणाऱ्या 10 जणांच्या टीममध्ये संजल गावंडेचा समावेश आहे. या कामगिरीतून तिने कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची कौतुकाची थाप तिच्या पाठीवर पडली आहे. (Sanjal Gawande’s Great success; A place in the private spacecraft team in the United States)
Maharashtra SSC Result 2021 : आज दुपारी दहावीचा निकाल; कुठे, कसा चेक कराल ? संपूर्ण माहिती एका क्लिकवरhttps://t.co/qlZ1TU4zjX#ssc | #sscresult | #sscresult2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
इतर बातम्या