मीरा भाईंदर : काही कारणाने झालेल्या वादातून महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला मारहाण (Beating) केल्याची घटना भाईंदर पश्चिमेला एका शिवसेना शाखेत घडली आहे. पप्पू भिसे (Pappu Bhise) असे मारहाण करण्यात आलेल्या शिवसेना शहर प्रमुखाचे नाव आहे. या मारहाणीचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्यात आले असून हा व्हिडिओ सोशळ मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (Shiv Sena city chief beaten by female Shiv Sainiks in Mira Bhayander)
भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना शाखेत शहर प्रमुख आणि महिला शिवसैनिक यांच्यात काही कारणावरुन वाद झाला. या वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले. यानंतर महिला शिवसैनिक यांनी शहरप्रमुख पप्पू भिसे यांना शाखेतून बाहेर काढून मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या प्रकरणी भाईंदर पोलिस ठाण्यात शहर प्रमुख पप्पू भिसे यांच्यासह अन्य एका व्यक्तीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शहर प्रमुख पप्पू भिसे यांच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या महिलांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलिस सखोल तपास करीत आहेत. (Shiv Sena city chief beaten by female Shiv Sainiks in Mira Bhayander)
इतर बातम्या
Ulhasnagar Crime : आक्षेपार्ह फोटो असल्याच्या संशयातून डॉक्टरने सुपारी देऊन नर्सचा मोबाईल चोरला