कार्यकर्ते म्हणाले, साहेब, केकचा तरी मान ठेवा अन् खासदारांनी जोडले हात; श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवस सेलिब्रेशनला नेमकं काय घडलं?

| Updated on: Feb 05, 2022 | 12:54 PM

शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा काल दणक्यात वाढदिवस साजरा झाला. उल्हासगनगरातील गोलमैदानाशेजारील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचं खास आयोजन केलं होतं.

कार्यकर्ते म्हणाले, साहेब, केकचा तरी मान ठेवा अन् खासदारांनी जोडले हात; श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवस सेलिब्रेशनला नेमकं काय घडलं?
कार्यकर्ते म्हणाले, साहेब, केकचा तरी मान ठेवा अन् खासदारांनी जोडले हात; श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवस सेलिब्रेशनला नेमकं काय घडंल?
Follow us on

उल्हासनगर: शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (shrikant shinde)  काल दणक्यात वाढदिवस (birthday) साजरा झाला. उल्हासगनगरातील (ulhasnagar) गोलमैदानाशेजारील शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचं खास आयोजन केलं होतं. दुपारपासूनच कार्यकर्ते वाढदिवसाच्या तयारीलाही लागले होते. पण खासदार शिंदे यांना मतदारसंघात यायला रात्री 10 वाजले. मात्र, तरीही कार्यकर्त्यांचा उत्साह मावळला नाही. कार्यकर्त्यांनी वाढदिवसासाठी खास केक आणला होता. शिंदे यांनी हा केक कापण्यास सुरुवात केली. तेवढ्यात कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं. खासदारांनी केक खाण्यासाठी मास्क काढला नसल्याने कार्यकर्त्यांनी त्यांना थांबवलं. साहेब, केकचा तरी मान ठेवा असं सांगत कार्यकर्त्यांनी त्यांना मास्क काढण्याचा आग्रह केला. पण शिंदे यांनी थेट कार्यकर्त्यांना हातजोडत मास्क काढण्यास नकार दिला. मास्क लावूनच शिंदे यांनी केक कापून कोरोना नियमांचं काटेकोरपालन करण्याचा संदेशच कार्यकर्त्यांना दिला.

कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा काल 4 फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. उल्हासनगरच्या गोलमैदान परिसरात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचं जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. खासदारांना शुभेच्छा देण्यासाठी शेकडो लोकांनी संध्याकाळपासूनच गर्दी केली होती. मात्र संपूर्ण मतदारसंघ फिरून उल्हासनगरला पोहोचायला खासदारांना रात्रीचे 10 वाजले. यावेळी कार्यकर्त्यांनी आणलेला केक खासदारांनी कापला. मात्र इतक्या गर्दीत केक खाण्यासाठी मास्क काढायला त्यांनी नकार दिला. यावर कार्यकर्त्यांनी ‘साहेब, केकचा तरी मान ठेवा’, असं म्हणताच खासदारांनी थेट हात जोडले.

शुभेच्छा देण्यासाठी झुंबड

श्रीकांत शिंदे यांनी केक कापल्यानंतर या कार्यकर्त्यांनी त्यांची तुला केली. त्यानंतर खासदार शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अक्षरश: झुंबड उडाली. शिंदे यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्यासोबत फोटो काढण्यासही कार्यकर्त्यांनी गर्दी केली. अनेकजण सेल्फी घेण्यासाठी धडपड करत होते. त्यामुळे या कार्यकर्त्यांना आवरणं कठिण झालं होतं.

संबंधित बातम्या:

शेतकरी कुटुंब मारहाण प्रकरणी आमदार राजू पाटील आक्रमक; आपल्यापेक्षा बिहार भला, ठाकरे सरकारवर निशाणा

जमिनीसाठी शेतकरी कुटुंबावर हल्ला, शिवसेनेच्या माजी नगरसेवकावर आरोप, मनसे आमदाराचा पोलीस ठाण्यातच ठिय्या

जगात भारी कल्याणकर: कासम शेख यांना आयटीतील आंतरराष्ट्रीय पातळीवरचा MVP पुरस्कार; महाराष्ट्रातून शेख एकमेव