कल्याणमध्ये धक्कादायक घटना, 15 लाखांचा तगादा, मग बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती, नंतर तलाक…तलाक…तलाक

| Updated on: Dec 23, 2024 | 5:03 PM

कल्याणमध्ये एका 28 वर्षीय महिलेवर तिच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने 15 लाख रुपयांची मागणी करून, बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. नकार दिल्यावर पतीने तिला मारहाण करून तीन तलाक दिला. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून पतीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. हा प्रकार मुस्लिम महिलांच्या हक्कांविरुद्ध असून कायद्याचे उल्लंघन करणारा आहे.

कल्याणमध्ये धक्कादायक घटना, 15 लाखांचा तगादा, मग बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती, नंतर तलाक...तलाक...तलाक
कल्याणमध्ये धक्कादायक घटना, 15 लाखांचा तगादा, मग बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती, नंतर तलाक...तलाक...तलाक
Follow us on

कल्याणमध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीला देण्यासाठी 15 लाख माहेरून आणण्याचा तगादा लावत 28 वर्षीय पत्नीला सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीने मारहाण, शिवीगाळ तीन तलाक करत दिला आहे. या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती इतका निष्ठूर वागला आहे की, त्याने आपल्या पत्नीला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केली. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

कल्याण पश्चिममध्ये एक 28 वर्षीय विवाहित मुस्लिम महिलेला तिच्या सॉफ्टवेअर इंजिनिअर पतीकडून 15 लाख रुपये माहेरून आणण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यानंतर पतीने तिला बॉससोबत शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती केली. पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने मारहाण करत तीन तलाक दिला आणि तिला घराबाहेर काढले.

नेमकं प्रकरण काय?

कल्याण पश्चिम येथील सर्वोदय सृष्टीमध्ये राहणाऱ्या 28 वर्षीय विवाहितेने बाजारपेठ पोलीस ठाण्यात आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, पती सोहेल हनिफउद्दीन शेख (45) याने पहिल्या पत्नीला 15 लाख रुपये द्यायचे असल्याने माहेरून पैसे आणण्यासाठी वारंवार दबाव टाकला.

हे सुद्धा वाचा

पतीने पत्नीला 5 डिसेंबरला बॉससोबत संबंध ठेवण्याची सक्ती केली. त्यावर पत्नीने नकार दिल्यानंतर पतीने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीला तीन वेळा तलाक बोलून घराबाहेर हाकलून दिले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि मुस्लिम महिला (विवाह संरक्षण) कायदा 2019 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश हरिपंत गाडवे करत असून आरोपी अद्याप फरार आहे.