ठाणे : ठाणेकर (Thane) करदात्यांना पहिल्या सहामाही सोबत दुसऱ्या सहामाहीचा सामान्य कर भरणेकरिता प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Vipin Sharma) यांनी 16 जून ते 15 जुलै 2022 पर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीचा फायदा ठाणेकरांनी घेतला असून जुलै 2022 अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे. यापुर्वी पालिकेचा कर जमा करताना अधिकाऱ्यांना अधिक कसरत करावी लागत होती. तसेच आगोदर कर जमा करणाऱ्या करदात्यांनी पालिकेकडून (TMC) सवलत देखील जाहीर करण्यात आली होती. 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाल्याने अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
मालमत्ता कर सवलतीचा लाभ ठाणेकरांनी घ्यावा यासाठी 15 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यत 4% सवलत देण्यात आली होती. या सवलतीस दिलेल्या मुदतवाढीस करदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला असून जुलै 2022 अखेर 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे, या कालावधीत मागील वर्षी 260 कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल झाला होता. यावर्षी मालमत्ता कराकरिता 770 कोटी रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट असून चार महिन्यातच त्यापैकी 45 टक्के वसुली म्हणजेच 345 कोटी रुपये इतका मालमत्ता कर जमा झाला आहे.
मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मालमत्ता कर चांगला तयार झाला आहे. गेल्यावर्षी मालमत्ता कर जमा करताना अधिकाऱ्यांनी दमछाक झाली होती. त्यातचं कोरोनाचं सावट असल्याने अनेकांनी दुर्लक्ष केलं होतं. कारण मागच्या दोन वर्षात देशातील सगळा कारभार टप्प होता. त्यामुळे गेल्यावर्षी कमी मालमत्ता कर जमा झाला होता. सध्या अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे. 15 जुलै 2022 ते 31 जुलै 2022 पर्यत 4% सवलत दिल्याने लवकर मालमत्ता कर जमा झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.