ठाणे : “म्हाडाच्या घरामध्ये पोलिसांकरिता काही घरं आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलिसांना विशेष कोटा दिला जाईल. तसेच फक्त पोलिसांकरिता विशेष घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे,” असे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले. ते ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. (state government is planning to build houses for police said Eknath Shinde)
यावेळी बोलताना, “राज्यात म्हाडा अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांमध्ये पोलिसांसाठी काही घरं आरक्षित ठेवण्यात येणार आहेत. तसेच पोलिसांकरिता विशेष घरं बांधण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. कोरोनामुळे अनेक प्रकल्प आणि योजना रखडल्या होत्या. तरी या योजनांना आता आर्थिक पाठबळ देऊन पूर्ण करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पोलीस वर्षाचे बारा महिने आणि दिवसाचे चोवीस तास आपल्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांना आपण सहकार्य केले पाहिजे,” असे ते म्हणाले.
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते 11 फेब्रुवारी रोजी मुंबईतील बीडीडी चाळीतील 300 रहिवाशांसाठी म्हाडाची लॉटरी यांच्या हस्ते काढण्यात आली होती. यावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख उपस्थित होते. बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी काढलेल्या लॉटरीबद्दल आदित्य ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या गृहनिर्माण खात्याचं कौतुक केलं होतं.
दरम्यान, महिनाभरापासून ठाण्याच्या वाहतूक विभागातर्फे रस्ते सुरक्षा अभियान राबविले गेले. या अभियानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. बुधवारी या कार्यक्रमाची सांगता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित झाली.
पवित्र मंदिर म्हणून ओळख, मात्र 30 वर्षांपासून बंद, दरवाजा खोलताच जम्मूत भक्तांच्या रांगाhttps://t.co/8Z2wSPW1Pa#temple | #JammuKashmir | #ShitalNathTemple
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 17, 2021
इतर बातम्या :
(state government is planning to build houses for police said Eknath Shinde)