ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौरा जाहीर केल्यापासून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. तर दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांना अवकाळी आणि गारपीटाचा फटका बसल्यामुळेही त्यांच्यावर हल्लाबोल केला जात आहे. ही टीका चालू असतानाच ठाकरे गटाचे आमदार भास्करराव जाधव यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावरून जोरदार निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला जाऊन थाटामाटात महाआरती करत आहेत. पण ज्या ठिकाणी आमच्या शाखेचे उद्घाटन होतं आहे. त्या ठिकाणची आमची शाखा पळवली, तिच त्यांची आज शाखा बंद आहे.
तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची हजारोच्या उपस्थितीत शाखेचे उद्घाटन झाले आहे असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
धनुष्यबाण हे रावणाच्या हातात चांगले दिसत नाही तर ते रामाच्या हातातच चांगले दिसते त्याचीच प्रचिती इथे आली आहे. शिवसेना ही बाळासाहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि त्याला लोकांच्या उपस्थितीमधून मान्यता देण्यात येत आहे अशी शब्दात त्यांनी एकनाथ शिंदे यांचा समाचार घेतला आहे.
आमदार भास्करराव जाधव यांनी आज पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. मला वाटले होते ही मंडळी प्रभुरामचंद्राच्या दर्शनाला गेली आहेत.
त्याठिकाणी प्रभुरामचंद्र त्यांना सद्बुद्धी देईल. मात्र रामदास कदम यांच्यासारखी माणसं त्यांच्या दरबारात तरी मर्यादा पाळतील असं वाटत होते मात्र तसे काही झाले नाही असं म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला.
मात्र स्वर्गीय माँसाहेबाबद्दल जी घाणेरडे वक्तव्य केले गेली होती. तेव्हाच आम्हाला कळाले होते की, मुंबईत जेवढी शौचालये आहेत.
त्यामध्ये जेवढी घाण आहे, त्यापेक्षा जास्त घाण रामदास कदम यांच्या पोटात असल्याचा घणाघात त्यांनी त्यांच्यावर केला आहे. आणि त्याचीच प्रचिती आता पुन्हा एकदा आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार भास्करराव जाधव यांनी अयोध्येच्या दौऱ्यावरूनही भाजपाने हा इव्हेंट म्हणून साजरा केला असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.