गणेश थोरात प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 21 मार्च 2024 : राज ठाकरे महायुतीत सामील होऊ शकतात. तशा बैठका होत आहे. राज ठाकरे यांनी दिल्लीत जात भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज मुंबईत बैठक पार पडली. मनसेने महायुतीत सहभागी होण्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय? यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीमध्ये मनसे देखील सहभागी होतील अशी घोषणा लवकरच ते करतील. आम्ही त्यांचं स्वागत करू, असं आनंद परांजपे म्हणाले.
दिल्लीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अमित शाह यांची भेट घेऊन राजकीय चर्चा झाली. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच बैठक झाली. जे जे घटक पक्ष येतील. त्यांचं स्वागत महायुती करेल. महायुतीमधील सर्व नेत्यांमध्ये समन्वय आहे. एकनाथ शिंदे अजित पवार ,देवेंद्र फडणवीस हे तिघेही बसून योग्य निर्णय घेतील महायुतीत जागावाटपात. प्रत्येकाला संधी मिळेल. मनसे जर महायुती मध्ये येत असेल तर राष्ट्रवादी त्यांचे स्वागत करेल. बैठकीला अजित पवार नसले तरी या बैठकीची माहिती अजित पवार यांना आहे, असं आनंद परांजपे म्हणाले.
आता लोकसभेची निवडणूक आहे ठाणे जिल्ह्यातील जागा असेल होणाऱ्या लोकसभेचा फायदा होईल. स्वप्न कधी साकार होतात कधी भंग ही होतात. जेव्हा विधानसभा येईल त्यावेळी वाटाघाटी होतील, असं म्हणत ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील जागावाटपावर परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली.
मनसे महायुतीत आल्यास उद्धव ठाकरे vs राज ठाकरे अशी राजकीय लढाई पाहायला मिळेल. यावर अनेक वेळा देवेंद्र फडणवीस, बावनकुळे यांनी संकेत दिले आहेतय मनसेची विचार सरणी, धेय्य धोरणे ही भाजप सारखी मिळती जुळती आहेत. महायुतीमध्ये त्यांना घेत असताना कुठेही वैचारिक वाद विचारधारा वेगळी आहे असे होणार नाही. यामुळे आश्चर्य व्यक्त करायची इच्छा नाही, असं आनंद परांजपे म्हणाले.