अजित पवार खरंच तिसरी आघाडी करणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, महायुतीत आम्ही…

| Updated on: Aug 31, 2024 | 2:56 PM

Anand Paranjpe on NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या निवडणुकीबाबत त्यांनी महत्वाचं विधान केलं आहे. तसंच जयंत पाटील आणि रोहित पवारांवरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर...

अजित पवार खरंच तिसरी आघाडी करणार?; राष्ट्रवादीच्या नेत्याचं स्पष्ट भाष्य, म्हणाले, महायुतीत आम्ही...
अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने मूक आंदोलन केलं. त्यानंतर अजित पवार गट तिसरी आघाडी करणार असल्याची चर्चा रंगली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही याबाबत ट्विट केलं. त्यानंतर या चर्चांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांना त्यांच्या पक्षात जयंत पाटील हे फारस महत्व देत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे फावला वेळ खूप आहे. मला माहित नाही त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू केला आहे का? मात्र अशा प्रकारची कुठलीही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. आम्ही महायुतीमध्येच निवडणूक लढू, असं आनंद परांजपे म्हणालेत.

महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय- परांजपे

षण्मुखानंद सभागृहात मेळावा पार पडला. तेव्हा स्पष्ट केलं होतं, की आगामी निवडणूक महायुती म्हणून लढवली जाईल. कोणीही आपली भूमिका स्पष्ट करू नये. तिन्ही पक्षाचे उत्तम समन्वय आहेत. अजित पवार जी भूमिका घेतात त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही , असंही आनंद परांजपे यांनी स्पष्ट केलं. महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना या हेल्पलाइन नंबरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या वतीने कामाला सुरुवात होणार आहे. योजनांची माहिती आणि समस्या असल्यास थेट व्हाट्सअप आणि हेल्पलाइन नंबर दिला जाणार आहे, असंही आनंद परांजपे यांनी सांगितलं.

विरोधकांवर हल्लाबोल

शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र यांनी जाहीर माफी मागितली. त्यानंतर ही तर ‘राजकीय माफी’ विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. यावर आनंद परांजपेंनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या प्रकरणात कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माफी मागितली आहे. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात. राहुल गांधींना माफी मागायला लावणार का? असा सवाल माझा संजय राऊत यांना आहे, असं म्हणत परांजपेंनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.