गणेश थोरात, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, ठाणे | 02 मार्च 2024 : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याची सर्वत्र चर्चा आहे. मुंबईतील भिवंडी लोकसभा मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळणार? यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांची देखील मागणी आहे. मात्र काँग्रेसची देखील मागणी असणार आहे. पहिली जागा काँग्रेसची या ठिकाणी होती. आणि काँग्रेसलाच मिळाली पाहिजे जागा वाटपाचा निर्णय सुरू आहे. नवीन चेहऱ्याला संधी मिळणार आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे गटाचे नेते दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात बाचाबाची झाली. यावरही बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. हे खोके सरकार आहे. पण यांची आपापसतच भांडण सुरू आहेत. एक आमदार पोलीस ठाण्यात गोळीबार करतो .अनेक आमदार लोकांना मारत आहेत. आमदारांमध्ये यांची धरपकड झाली विधान सभा पटांगणा झाले हे दुर्दैवाची गोष्ट आहे कोणताही कंट्रोल त्यांच्याकडे नाही. सर्व संयम त्यांचे सुटलेले आहे. सरकारची प्रतिमा पूर्ण पणे मालिन झाली आहे, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
देशात महागाई वाढली आहे . शेतकऱ्यावर भार देऊ नये. शेतकऱ्यांना मारून हे स्वस्त देण्याचं काम देत आहे. निर्यात बंदी केलेली आहे शेतकरी अडचणीत आहे. सामान्य मध्यमवर्गी अडचणीत आहेय जनतेचे लक्ष विचलित करण्याचे काम भारतीय जनता पक्ष करत आहे, असं म्हणत थोरातांनी सरकारवर टीका केली आहे.
शरद पवार यांनी जातीचा उल्लेख केला असं मला वाटत नाही. मनोज जरांगे पाटील यांना या मानसिकतेला नेऊन ठेवण्याला कोण जबाबदार आहे? आम्ही देखील त्यांच्या जातीबाबतच्या विधानांना सहमत नाही. महाराष्ट्रात जाती धर्माचे राजकारण करू नये, हे आमची देखील अपेक्षा आहे. सोपं राजकारण म्हणजे जाती-धर्माचे राजकारण आहे. त्यामुळे सत्ता मिळण्यासाठी जाती-धर्माचे राजकारण भाजप करत आहे.मूळ प्रश्नापासून विचलित करण्यासाठी भाजप पक्ष काम करत आहे, असं म्हणत बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली आहे.