यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू, तिघे जखमी

| Updated on: Apr 16, 2021 | 11:43 PM

भिवंडी तालुक्यात यंत्रमाग कारखान्याची धोकादायक भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले आहेत. (thane bhiwandi labour dead)

यंत्रमाग कारखान्याची भिंत कोसळली; तीन मजुरांचा मृत्यू, तिघे जखमी
BHIWANDI LABOUR DEATH
Follow us on

ठाणे : भिवंडी तालुक्यात यंत्रमाग कारखान्याची धोकादायक भिंत कोसळल्याची घटना शुक्रवारी (16 एप्रिल) सायंकाळी घडली आहे . या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू तर तीन मजूर जखमी झाले आहेत. जखमी मजुरांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रणछोड प्रजापती ( वय 50 वर्षे ), भगवान मामा ( वय 55 वर्षे ), मनसुख भाई ( वय 45 वर्षे ) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मजुरांची नावे आहेत. (Thane Bhiwandi Three labour found dead after the wall collapse)

कारखान्याच्या भिंती जीर्ण, बांधकाम सुरु

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी तालुक्यात काटई ग्रामपंचायत हद्दीत देवानंद कंपाऊंड येथे एक यंत्रमाग कारखाना आहे. या कारखान्याच्या भिंती जीर्ण झालेल्या आहेत. हा यंत्रमाग कारखाना मागील दोन महिन्यांपासून बंद असून त्याच्या जीर्ण झालेल्या भिंतींच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. कामगार तसेच मजुरांच्या मार्फत हे दुरुस्तीचे काम सुरु होते. यावेळी भिंतीचे काम करण्यासाठी मजुरांनी बांबूची परांचीदेखील बांधली होती.

भिंत कोसळल्यामुळे तिघांचा मृत्यू

या परांचीवर उभं राहून मजूर भिंतीचे काम करत होते. मात्र हे काम सुरु असतानाच लोखंडी अँगल आणि पत्र्याचा भार जीर्ण भिंतींवर पडल्याने भिंत कोसळली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर तीन जण या दुर्घटनेत जखमी झाले आहेत.

निजामपुरा पोलीस ठाण्यात नोंद

जखमी झालेल्या मजुरांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. तर मृत्यू झालेल्या मजुरांच्या कुटुंबीयांवर शोककळा आली असून सर्व स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. मृत मजुरांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचीही मागणी यावेळी करण्यात येत आहे. या घटनेची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

ST कंडक्टर तरुणीच्या अंगावर चटके, खून करुन माळरानावर फेकलं, डेपो हादरला

VIDEO : पोलीसही माणूस, त्याला इतकी निघृणपणे मारहाण का? दोन महिला, सहा पुरुषांचं अमानुष कृत्य, व्हिडीओ व्हायरल

कौटुंबिक कलहाला कंटाळून औरंगाबादेत विवाहितेची दोन चिमुकल्यांसह आत्महत्या

(Thane Bhiwandi Three labour found dead after the wall collapse)