ठाणे : अंबरनाथ पश्चिमेच्या चिंचपाडा परिसरात कालिका मातेचं मंदिर आहे. या मंदिरात सोमवारी सकाळी ९ च्या सुमारास निळा ड्रेस घातलेली एक महिला दर्शन घेण्याच्या बहाण्याने आली. यानंतर तिने गाभाऱ्यासमोर असलेल्या रेलिंगवरून आत जात थेट देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार चोरला आणि पळून गेली. काही वेळाने मंदिराचे पुजारी नवीन शेट्टी हे तिथे आल्यानंतर त्यांना देवीच्या गळ्यातील हार फुलं अस्ताव्यस्त दिसली. त्यामुळं त्यांनी जवळ जाऊन तपासलं असता देवीच्या गळ्यातला सोन्याचा हार गहाळ असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळं त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक करताच त्यामध्ये दर्शनासाठी आलेल्या या महिलेने देवीचा हार चोरल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी नवीन शेट्टी यांच्या तक्रारीनुसार अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलीस सध्या सीसीटीव्हीच्या आधारे या महिलेचा शोध घेतायत.
कालिका मातेचं मंदिरात निळा सलवार कुर्ता घातलेली महिला दर्शनासाठी आले. तेव्हा मंदिरात कुणीही दिसले नाही. तिला वाटले चांगली संधी आहे. बाहेरून दर्शन न घेता ती मंदिरात मूर्तीजवळ गेली. आजूबाजूला पाहिले कुणीचं दिसले नाही. चेहरा ओढणीने झाकला होता. त्यामुळे ती कोण आहे हे स्पष्टपणे ओळखता येत नाही. तिने देवीच्या गळ्यातील हार काढला. मूर्तीला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर घाईघाईने खाली उतरली. त्यावेळी तिचा चालण्याचा वेग वाढला होता. तिला पटकन निघून जायचे होते. असे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले.
थोड्या वेळाने पूजारी आले. त्यांना मूर्तीच्या माळा अस्ताव्यस्त झालेल्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी त्या बारकाईने पाहिल्या. तेव्हा मंदिरातील मातेच्या गळ्यातील हार त्यांना दिसला नाही. लगेच एकमेकांना विचारणा करण्यात आली. पण, मूर्तीच्या गळ्यातील हाराबद्दल कुणी सांगेना. वेळ न घालवता सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. तेव्हा दर्शनासाठी आलेल्या महिलेनेचं तो हार नेल्याचं समोर आलं. आता त्या महिलेचा तपास सुरू आहे.