ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं. तर विरोधकांवर शाब्दिक हल्ला चढवला. कौरव विरुद्ध पांडव अशी लढाई आपण ऐकलेली आहे.आतही तशीच परिस्थिती भारतात पाहायला मिळतेय. महायुती विरुद्ध राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत पक्ष आहेत. आमच सगळ्यांचं ठरलेलं आहे. आम्ही निवडून आल्यानंतर मोदीजी पंतप्रधान असतील. आम्ही विरोधकांना प्रश्न विचारला तुमचा पंतप्रधान कोण असेल? त्यावेळी सकाळी बोलणारे पोपटलाल म्हणाले आमच्याकडे पाच उमेदवार आहेत… आम्ही दरवर्षी एक पंतप्रधान निवडू. मग म्हटलं पहिला कसा निवडाल तर त्याचं उत्तर नव्हतं. संगीतखुर्ची खेळून जो आधी खुर्चीवर बसेल त्याला पीएम बनवायचं आहे का? असा प्रश्न आम्ही विरोधकांना विचारला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पंतप्रधान बनवणे संगीतखुर्च खेळण्यासारखा प्रकार नाहिये हे आम्ही त्यांना सांगितलं. आम्ही देशातल्या वेगवेगळ्या घटकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम करतोय. म्हणून आमचे पंतप्रधान विकासपुरुष आहेत. देशातल्या 12 बलुतेदार आहेत. त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जातोय. देशातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणाऱ्या माणसाचे नाव आहे नरेंद्र मोदी… राहुल गांधी अश्या प्रकारचं नेतृत्व देऊ शकतील का?, असा सवाल फडणवीसांनी या सभेत उपस्थित केला.
मुरबाडला ट्रेन आणलीय आणि या ट्रेंनचे इंजिन नरेंद्र मोदी आहेत. आमच्यासोबत असणारे पक्ष या ट्रेनचे डब्बे आहेत. दिन दलित दुबळ्यांना, गरजूंना घेऊन सोबत ही ट्रेन सुसाट धावणार आहे. राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या लोकांकडे डब्बेच नाहीयेत. सगळ्यांना इंजिन बनायचं आहे. उद्धव ठाकरेकडे फक्त आदित्य ठाकरेंसाठी जागा आहे. राहुल गांधींकडे फक्त सोनिया गांधीसाठी जागा आहे. अडीच वर्ष महाविकास आघाडीने एकही ट्रेनच्या प्रकल्पाला अर्धा हिसा दिला नाही. आमच सरकार येताच आम्ही आधी तो नियम बदलला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला.
येत्या काळात नगरपर्यंत ही ट्रेन न्यायची आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करणार आहोत. आमदार आणि खासदार दोघेही सांगतील ज्या ज्या रस्त्यांची काम सांगितली त्याला कधीही नाही म्हटलं नाही. कपिल पाटील आणि किसन कथोरे हे माझे डोळे आहेत. त्यात भेदभाव नाही. कपिल पाटील यांना खासदार करण्यासाठी किसन कथोरे जीवाच रान करतील हा देवेंद्र फडणवीस यांचा शब्द आहे. हॉटेलात गेल्यावर आधी स्टार्टर येतं… मग जेवण येतं… तसं मोदीजी म्हणतात आताची 10 वर्षे हा ट्रेलर होता. आता खरी सुरुवात आहे…, असं देवेंद्र फडणवीस मुरबाडच्या सभेत म्हणाले.