Thane: ठाणे जिल्ह्यात मोफत बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद, तीन दिवसात 31 हजार जणांचे लसीकरण

| Updated on: Jul 19, 2022 | 3:18 PM

ठाणे, केंद्र सरकारकडून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत (Free Booster dose) देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे (Thane) जिल्ह्यातदेखील  या अंतर्गत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रविवारपासून त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर 31 हजार नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला […]

Thane: ठाणे जिल्ह्यात मोफत बूस्टर डोसला चांगला प्रतिसाद, तीन दिवसात 31 हजार जणांचे लसीकरण
Follow us on

ठाणे, केंद्र सरकारकडून ‘कोविड लस अमृत महोत्सव’ अंतर्गत पुढील 75 दिवस बूस्टर डोस मोफत (Free Booster dose) देण्यात येणार आहे. त्यानुसार ठाणे (Thane) जिल्ह्यातदेखील  या अंतर्गत बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, रविवारपासून त्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. त्यात मागील दोन दिवसांत जिल्ह्यातील विविध शासकीय लसीकरण केंद्रांवर 31 हजार नागरिकांना बूस्टर डोस देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली. जानेवारी महिन्यापासून आरोग्य सेवक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि 60 वर्षांवरील नागरिकांसाठी बूस्टर डोस देण्यास सुरुवात झाली होती.  रविवारी देखील नागरिकांसाठी शासकीय लसीकरण केंद्र सुरू होते. त्यामुळे मागील दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील 31 हजार नागरिकांनी विविध शासकीय केंद्रांवर जाऊन बूस्टर डोस घेतला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

मीरा भाईंदरमध्ये लसींचा तुटवडा

मिरा-भाईंदर महानगरपालिकेने सुरू केलेल्या कोरोना बूस्टर डोस लसीकरणाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच महापालिकेकडील कोविशिल्ड लशींचा साठा संपुष्टात आला आहे. परिणामी, बूस्टर डोस लसीकरण मोहिमेत अडथळा निर्माण झाला आहे. 18 वर्षांवरील सर्वांना 75 दिवसांसाठी मोफत बूस्टर डोस देण्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेकडील कोविशिल्ड लशींचा बूस्टर डोसचा साठा संपुष्टात आला असल्यामुळे या लसीकरणात खंड पडला आहे.

कोणाला घेता येणार बूस्टर डोस

तुम्ही लसीचे दोन डोस घेतले असतील आणि ते घेऊन जर सहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला असेल, तर केंद्र सरकारच्या निकषांनुसार तुम्ही कोरोना लसीचा बूस्टर डोस घेण्यास पात्र आहात. कोणत्याही महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर जाऊन तुम्ही कोरोना प्रतिबंधक लसीचा बूस्टर डोस घेऊ शकता. याआधी बूस्टर डोस फक्त 60 वर्षांवरील नागरिकांसाठी उपलब्ध होते, मात्र यावर्षी एप्रिलमध्ये सरकारने मोठा निर्णय घेत बूस्टर डोस 18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार असल्याचे जाहीर केले.

हे सुद्धा वाचा

बूस्टर डोस घेतल्याने काय होणार

कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट निर्माण होत आहेत. या प्रत्येक व्हेरियंटचा प्रभाव आणि लक्षणं वेगवेगळी असल्याचेही समोर आले आहे. अशातच कोरोना प्रतिबंध लसीचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांनी त्यांचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कोरोना लसीचा तिसरा डोस म्हणजेच, बूस्टर डोस घेणं आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढून कोरोनापासून बचाव होण्यास मदत होते.