महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही, भाजपचा घणाघात

| Updated on: Feb 02, 2022 | 2:31 PM

कल्याण डोंबिवली महापलिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर होताच राजकारण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी वीर सावरकरांचा फोटो या मुद्यावर घाणाघाती टीका केली आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शिवसेनेने सावरकरांचा फोटो लावला नाही, भाजपचा घणाघात
सावरकरांच्या फोटोवरुन शिवसेना-भाजपात घमासान
Follow us on

ठाणे : प्रजासत्ताक दिनी (Republic Day) शिवसेना नेत्यांकडून सर्व क्रांतिकारकांचे फोटो लावण्यात आले. मात्र स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Veer Savarkar) यांचा फोटो लावला केला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून घृणास्पद असा प्रयत्न करण्यात आला. मात्र आम्ही हे होऊ देणार नाही, असा आरोप भाजप आमदार रविंद्र चव्हाण (BJP MLA Ravindra Chavan) यांनी केला आहे. मात्र आमदारांकडून काही काम झाले नाही. फक्त जातीपातीचे राजकारण केले जात आहे. चव्हाण यांचा आरोप अत्यंत चुकीचा आहे. वीर सावरकरांचा फोटो लावण्यात आला होता, असा पलटवार शिवसेना डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी केला आहे. वीर सावरकरांच्या मुद्यावरुन शिवसेना भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं चित्र आहे.

कल्याण डोंबिवली महापलिका निवडणुकीची प्रभाग रचना जाहीर होताच राजकारण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे. भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी अन्य पदाधिकाऱ्यांसोबत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रविंद्र चव्हाण यांनी वीर सावरकरांचा फोटो या मुद्यावर घाणाघाती टीका केली आहे.

प्रजासत्ताक दिनी फोटो लावण्यावरुन वाद

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख आणि स्थानिक नेत्यांकडून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. या दिवशी सर्व क्रांतिकारकांचे फोटो लावले होते. मात्र वीर सावरकारांचा फोटो लावला गेला नाही. एका प्रभागाचे नाव वीर सावरकर रोड होते. तेही बदलण्यात आले. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना खूष करण्यासाठी अत्यंत घृणास्पद प्रयत्न शिवसेनेकडून सुरु आहे. हे आम्ही अजिबात होऊ देणार नाही, अशी टीका आमदार चव्हाण यांनी केली.

शिवसेनेने आरोप फेटाळले

शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मोरे यांनी भाजप आमदारांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वीर सावरकरांचा फोटो लावण्यात आला होता. डोंबिवलीत लाडक्या आामदारांकडून काही कामे झोलेली नाही. ते फक्त जातीय द्वेषाचे राजकारण करतात. हा केवळ त्यांचा खोडसाळपणा आहे असा पलटवार मोरेंनी केला आहे.

वीर सावरकरांच्या यांच्यावरुन कल्याण डोंबिवलीत राजकारण चांगलेच तापले आहे. या मुद्यावरुन शिवसेना भाजपमध्ये जुंपली आहे. येणाऱ्या काळात राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

सावरकर धार्मिक नेते नव्हते; हिंदुत्वाचा हिंदू धर्माशी संबंध नाही, दिग्विजय सिंग यांचा भाजपावर निशाणा

सावरकरांना भारतरत्न कधी देणार?; संजय राऊतांचा आता थेट मोहन भागवतांनाच सवाल

महात्मा गांधींच्या जागी ते सावरकरांना राष्ट्रपिता करणार, ओवेसींचा राजनाथ सिंह यांच्यावर हल्लाबोल