मोठी घटना ! ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, दोन बोटे तुटली, फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर

| Updated on: Aug 30, 2021 | 9:12 PM

महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे चक्क तुटून पडली आहेत.

मोठी घटना ! ठाण्यात सहाय्यक पालिका आयुक्तांवर फेरीवाल्याचा हल्ला, दोन बोटे तुटली, फेरीवाल्यांची गुंडगिरी पुन्हा चव्हाट्यावर
THANE KALPITA PIMPLE
Follow us on

ठाणे : महापालिकेच्या माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने भीषण हल्ला केला आहे. या हल्ल्यात कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे चक्क तुटून पडली आहेत. तर हल्ल्यादरम्यान पिंपळे यांच्या संरक्षणासाठी धावलेल्या त्यांच्या सुरक्षारक्षकाचेही एक बोट तुटले आहे. या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी फेरीवाल्याला ताब्यात घेतले आहे. अमरजित यादव असे आरोपी फेरीवाल्याचे नाव आहे. (Thane Municipal Corporation Assistant Commissioner Kalpita Pimples attacked by hawkers chopped off her two fingers)

पिंपळे फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेल्या होत्या

मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महापालिकेच्या माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत काही फेरीवले फिरत होतो. याच भागातील कासारवडवली नाक्यावर सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारावाई करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कारवाईच्या दरम्यान अमरजित यादव या माथेफिरु फेरीवाल्याने पिंपळे यांच्यावर चाकूने अचानकपणे हल्ला केला.

हल्ल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे तुटून पडली

अचानकपणे हल्ला झाल्यामुळे पिंपळे घाबरल्या. त्यांनी स्वत:चा बचाव करण्यासाठी आपला डावा हात वर केला. याचवेळी फेरीवाल्याने धारदार शस्त्राने केकेल्या हल्यात पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटेच तुटून पडली. याआधी माथेफिरू फेरीवाला आक्रमक झाल्याचे समजताच पिंपळे यांचा सुरक्षारक्षक सतर्क झाला होता. फेरीवाल्याने हल्ला केल्यानंतर पिंपळे यांचा सुरक्षारक्षक मध्ये आला. यावेळी सुरक्षारक्षकचेही एक बोट तुटले आहे.

पिंपळे यांच्यावर ज्यूपिटर रुग्णालयात उपचार

या धक्कादायक घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आधी जवळच्याच वेदांत रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात होते. त्यानंतर सहायक आयुक्त कल्पिता पीपळे यांच्यासह त्यांच्या सुरक्षारक्षकाला ज्यूपिटर रुग्णलायात हलवण्यात आले आहे. तर अमरजित यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतलेय.

राज्यात कायद्याचे राज्य आहे का ?, आशिष शेलार यांची टीका

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करुन एका फेरिवाल्याने बोटे तोडल्याची अत्यंत चीड आणणारी घटना आज ठाण्यात घडली. राज्यात कायद्याचे राज्य आहे का ? सरकार नावाची गोष्ट शिल्लक आहे का ? महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे एवढे धिंडवडे कधीच उडाले नव्हते !,” असा वार शेलार यांनी केला आहे.

इतर बातम्या :

जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, मनी लाँडरिंग प्रकरणात 5 तासापासून सुरु आहे ईडीची चौकशी

100 किलो गांजा तस्करीसाठी अजब युक्ती, नागपुरात महागडी कार ताब्यात घेतल्यानंतर पोलीसही अवाक

नवरी बारा वेळा बोहल्यावर चढली, बाराव्या ‘सासरी’ अशी अडकली नि पोलिसांनी ठोकल्या बेड्या

(Thane Municipal Corporation Assistant Commissioner Kalpita Pimples attacked by hawkers chopped off her two fingers)