ठाणे : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सातव्या वेतन आयोगाच्या (Seventh Pay Commission) प्रतीक्षेत होते. अखेर आता ही प्रतीक्षा संपली आहे. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने (Administration) घेतला असून, त्याबाबतचे आदेश देखील जारी करण्यात आले आहेत. एक जानेवारी 2016 पासून हा आदेश लागू होणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पाच हजार कर्मचाऱ्यांना या वेतन आयोगाचा फायदा होणार आहे. ठाणे महापालिकेतील (Thane Municipal Corporation) कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने कार्मचाऱ्यांना आता याचा मोठा फायदा होणार असून, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये सुमारे 6 हजार 900 कर्मचारी काम करतात. ज्याप्रमाणे इतर महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला त्याचप्रमाणे आम्हाला देखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळावा अशी मागणी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. सातव्या वेतन आयोगाबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. तसेच महासभेत देखील ठराव मांडण्यात आला होता. अखेर आता ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या वेतन आयोगाचा लाभ पाच हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
सुरुवातीच्या टप्प्यात सातव्या वेतन आयोगाचा लाभ हा पाच हजार कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे. ठाणे महापालिकेत एकूण 6 हजार 900 कर्मचारी काम करतात. महापालिकेत एकूण 346 संवर्ग असून, त्यापैकी 218 संवर्गांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे. उर्वरित 117 संवर्गांना देखील सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्यात यावा का? याबाबत शासनाचा अभिप्राय मागवण्यात आला आहे. अभिप्राय आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती महपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.