ठाणे : ठाण्यात जुलै महिन्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या शहरात सुध्दा चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे साथीच्या आजारींनी डोकेवरती काढले आहे. डोळ्याची साथ (Eye Flu) राज्यात अनेक जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यात डोळे येण्याची साथ इतकी पसरली आहे की, लोकांनी गॉगल घालण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यात (THANE NEWS) सुध्दा मागच्या दोन दिवसात ५९ डोळे आलेले रुग्ण सापडल्यामुळे आरोग्य विभागाने काळजी ठाणेकरांना काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात डोळे (Eye Flu News in Marathi) येण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे लोकं काळजी घेत आहेत.
पावसाने थोडीसी उघडीप दिल्यानंतर अनेक विविध संसर्ग आजार डोकेवरती काढतात. सध्या ताप येणे, सर्दी होणे, याचबरोबर डोळे येण्याचे रुग्ण सुध्दा वाढले आहेत. आरोग्य विभागाकडून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. ठाणे शहरात गेल्या तीन दिवसात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयासह पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात डोळे येण्याचे ५९ रुग्ण आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. त्यामुळे आता महापालिकेचे आरोग्य विभाग सतर्क झाले असून त्यांनी डोळ्यांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
पावसाळ्यात साथीच्या आजार डोकेवरती काढतात, त्यामुळे त्याची काळजी घेण्यासाठी पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्याचं मिळतं. सध्या राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे मच्छरचं प्रमाण अधिक वाढलं आहे. पालिकेकडून विविध फवारणी करणं सुरु आहे.
डोळ्यांची साथ राज्यात अनेक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्य विभागाने काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.