कल्याण : कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. अविनाश गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. गायकवाड नावाचा हा चोरटा जेलमधून दोनदा पळून गेला होता. जेलमधून फरार झाल्यानंतर त्याने अनेक लुटीचे गुन्हे केल्याची उघड झाले आहे. त्याने चोरलेले पाच महागडे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत.
कल्याणमध्ये राहणारे मनिष गुप्ता यांची आई त्यांच्या मूळ गावी आजमगडला जाण्यासाठी निघाली होती. गुप्ता या 22 डिसेंबर रोजी 11 वाजून 45 मिनिटांनी जाणाऱ्या गोदाम एक्सप्रेसने उत्तर प्रदेशला रवाना होणार होत्या. मुलगा मनिष गाडीत बसवण्यासाठी आईला घेऊन कल्याण रेल्वे स्थानकात आला. मात्र गाडी स्थानकात येण्यास वेळ होता. आईसाठी फळे खरेदी करण्याकरीता मनिष हा कल्याण रेल्वे स्थानकातून बाहेर पडला. एसटी स्टॅण्ड समोर उभ्या असलेल्या एका हातगाडीवरून त्याने फळे घेतली. याच दरम्यान त्याचा मोबाईल हिसकावून एक अज्ञात चोरटा पसार झाला.
याबाबत मनिषने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मागदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास करण्याकरीता महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने आणि पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील यांनी एक विशेष तपास पथक तयार केले. पोलिसांनी तपास सुरु केला. माहितीच्या आधारे एसटी स्टॅण्डला सापळा लावून पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान माहिती समोर आली की, याच तरुणाने मनिषचा मोबाईल चोरी केला होता. अविनाश गायकवाड असे या चोरट्याचे नाव आहे.
पोलिसांनी अविनाश गायकवाड संदर्भात माहिती काढली तेव्हा पोलीसही हैराण झाले. अविनाश हा 20 जुलै 2020 रोजी आधारवाडी कारागृहात त्याचा साथीदार श्याम चव्हाण सोबत पळून गेला होता. पळून गेल्यावर त्याने मोबाईल चोरीचा धंदा सुरु केला. त्याच्याकडून पोलिसांनी पाच मोबाईल हस्तगत केले आहेत. अविनाश हा काही वर्षापूर्वी सोलापूरच्या कारागृहातून पळून गेल होता. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. अविनाशच्या विरोधात राज्यभरात 15 गुन्हे दाखल आहेत, पुढील तपास पोलिस करीत आहेत. (The culprit was arrested by Mahatma Phule police of Kalyan)
इतर बातम्या
TET Exam: मला टार्गेट केलं जातंय, यामुळे आत्महत्या करावीशी वाटतेय, तुकाराम सुपेचा इशारा!
लुधियाना स्फोट प्रकरण; बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्यानेच ठेवला बॉम्ब