ठाणे : बिबट्याच्या (Leopard) पिल्लाच्या डोक्यात पाणी पिताना (Drinking water) पाण्याची कॅन अडकल्याचा प्रकार ठाणे (thane) जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमधून समोर आला आहे. या पिल्लाचा अखेर 48 तासांनी शोध घेण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभाग आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पॉज संस्थेनं या बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली आहे. सुटकेनंतर या बिबट्याच्या बछड्याला उपचारासाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या पिल्लाच्या डोक्यात पाण्याची बाटली अडकल्याचा हा प्रकार एका पर्यटकाने व्हिडीओ शूट करून समोर आणला होता. साधारण एक ते दीड वर्षाचं हे पिल्लू गोरेगावच्या एका रिसॉर्टच्या परिसरात रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. याबाबतची माहिती मिळताच वनविभाग, संजय गांधी नॅशनल पार्क, प्लॅन्ट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) यांच्या माध्यमातून या पिल्लाचा शोध घेण्यात आला, अखेर हे पिल्लू आढळून आल्यानंतर त्यांनी या पिल्लाच्या डोक्यात अडकलेला ड्रम सुखरुप काढला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, साधारण एक ते दीड वर्षाचं हे पिल्लू गोरेगावच्या एका रिसॉर्टच्या परिसरात रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. याबाबतची माहिती मिळताच वनविभाग, संजय गांधी नॅशनल पार्क आणि प्लॅन्ट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) यांच्या माध्यमातून या पिल्लाचा शोध घेण्यात आला, अखेर हे पिल्लू आढळून आल्यानंतर त्यांनी या पिल्लाच्या डोक्यात अडकलेला ड्रम सुखरुप बाहेर काढला. डोक्यात ड्रम अडकल्याने गेल्या दोन दिवसांपासून या पिल्लाला काहीही खाता -पिता आले नाही. त्यामुळे हे पिल्लू दोन दिवसांपासून उपाशीच होते. अखेर आज संध्याकाळी सातच्या सुमारास गोरेगाव पाडा भागात हे पिल्लू आढळून आलं. यानंतर त्याला बेशुद्ध करून त्याच्या डोक्यातली पाण्याची कॅन काढण्यात आल्याची माहिती पॉज संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी दिली .
दरम्यान, या बिबट्याच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली असता, ते 2 दिवस अन्नपाण्यावाचून फिरत असल्यानं डिहायड्रेटेड असल्याचं आणि काहीसं अशक्त झाल्याचं संजय गांधी नॅशनल पार्कच्या डॉक्टर्सच्या लक्षात आलं. त्यामुळं या बिबट्याच्या पिल्लाला उपचारांसाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं आहे. तिथे उपचार करून ठणठणीत झाल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली जाणार आहे. बिबट्याचं हे पिल्लू जिवंत सापडल्यामुळे प्राणीप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.