कल्याण : कल्याण डोंबिवलीसह अंबरनाथ बदलापूर शहरातील केमिकल कंपन्यातून केमिकल युक्त सांडपाणी अनेकदा टँकरच्या माध्यमातून थेट नदी नाल्यात सोडले जाते. केमिकलयुक्त सांडपाणी नदी नाल्यात सोडल्याने प्रदूषण होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी केमिकल टँकरवर वॉच ठेवण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी, पोलीस प्रशासन आणि आरटीओ यांच्या माध्यमातून संयुक्त पथक तयार करण्यात आले. नदी नाल्याच्या परिसरात या पथकाचा वॉच राहणार असून केमिकल टँकर नदी नाल्यात सोडल्यास कायदेशीर कारवाई करुन टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाणार आहे.
कल्याण डोंबिवली परिसरातील डोंबिवली येथे केमिकल कंपन्या आहेत. त्याचबरोबर अंबरनाथ आणि बदलापूर येथेही केमिकल कंपन्या आहेत. या कंपन्यातून केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया करुन नदी नाल्यात सोडले जात असले तरी काही केमिकल कंपन्या या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता टँकरच्या माध्यमातून थेट नदी नाल्यात सोडतात. त्यामुळे उल्हास नदी वालधुनी नदीचे प्रदूषण होत आहे. अशा टँकरवर वॉच ठेवण्यासाठी संयुक्तिक पथक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आरटीओसह प्रदूषण नियंत्रण मंडळ, एमआयडीसी आणि स्थानिक पोलिसांचा समावेश आहे.
या संयुक्त पथकाकडून केमिकल टॅन्करवर वॉच ठेवला जाणार आहे. हे टँकर विशेषत: रात्रीच्या अंधारात फिरतात. संध्याकाळी सहा ते पहाटे सहा वाजेपर्यंत हा वॉच अधिक जागरुकपणे ठेवला जाणार आहे. यापूर्वी उल्हास नदी आणि वालधुनी नदी पात्रात रासायनिक टँकरने केमिकलयुक्त सांडपाणी सोडल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. तसेच गुन्हा दाखल करुन चालकाच्या विरोधात कारवाईही करण्यात आलेली आहे. आता हीच कारवाई अधिक तीव्र करण्यावर संयुक्तिक पथक भर देणार आहे. पोलीस अशा टँकर चालकाला अटक करुन त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करतील. पर्यावरणाला हानी पोचवून प्रदूषण केल्याप्रकरणीही कारवाई केली जाईल. त्याचबरोबर आरटीओकडून अशा प्रकारचा टँकर कायम स्वरुपी जप्त केला जाईल असे कल्याण आरटीओ तानाजी चव्हाण यांनी सांगितले. (The joint team will now keep a watch on the chemical tanker that discharges chemical wastewater)
इतर बातम्या
Kalyan Crime : मंडप डेकोरेशनचे पैसे मागितले म्हणून एकाला बेदम मारहाण; एकाला अटक तर दोघे फरार