ठाणे – ठाण्यात (Thane) कायम वाहतुकीच्या खोळंब्यासाठी प्रसिध्द असलेल्या कळव्याच्या खाडी पूलाचं (Kalwa creek bridge) काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे खाडी पूलावरती आता वाहनांच्या रांगा आता दिसणार नाहीत. तसेच काल पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी तयार झालेल्या पूलाची पाहाणी केली. त्यावेळी त्यांनी हा पूर मे महिन्या अखेरीस वाहतूकीसाठी खूला केला जाईल असं सांगितलं. विशेष म्हणजे मे महिन्याच्या अखेरीस पूल एकाबाजूने सुरूवातीला खुला करण्यात येणार आहे. पूल सुरू करण्याची सर्व तयारी पालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. ज्यावेळी आयुक्त पूलाच्या बास्केट हॅडेलवरती पोहचले त्यावेळी त्यांच्यासोबत अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्यांचा ताफा देखील होता. हा पूल सुरू झाल्यानंतर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कळव्याचा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे
ठाण्यातून बाहेर जाण्यासाठी कळव्याचा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. तिथं अनेकजण यापुर्वी वाहतूक कोंडीत अडकलेले आहेत. तो पूल वाहतूक कोंडीसाठी प्रसिध्द होता. मे महिन्याच्या अखेरीस हा पूल सुरू झाल्यानंतर अनेकांना दिलासा मिळेल. हा पूल सुरू झाल्यानंतर ठाणे पोलिस आयुक्तालय ते कळवा छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय प्रवास अगदी जलदगतीने होणार आहे. त्यामुळे हा मार्ग लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काल अनेक अधिकाऱ्यांच्या समवेत आयुक्तांनी पुलाची पाहणी केली आहे.
आयुक्तांसोबत होते हे महत्त्वाचे अधिकारी
आयुक्तांनी ज्यावेळी पूलाचा कामास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उपआयुक्त मारूती खोडके, अशोक बुरपल्ले, मनीष जोशी, अतिरिक्त अभियंता अर्जुन अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, सहाय्यक आयुक्त समीर जाधव, कार्यकारी अधियंता मोहन कलाल, मनोज तायडे, धनाजी मोदे, विकास ढोले, महेश अमृतकर, वरिष्ठ उद्यान अधीक्षक केदार पाटील, आगार व्यवस्थापक दिलीप कानडे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.