ठाणे : बिबट्याच्या पिल्लाच्या (Leopard cub) डोक्यात बाटली (Bottle) अडकल्याचा प्रकार ठाणे (Thane) जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमध्ये समोर आलाय. या पिल्लाचा गेल्या 36 तासांपासून शोध घेतला जातोय. बिबट्याचं हे पिल्लू साधारण एक वर्षाचं असून गोरेगाव परिसरात परवा रात्री ते पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. त्यामुळं कॅन अडकलेलं हे बिबट्याचं पिल्लू फिरत असतानाच एका पर्यटकाला दिसलं. त्यामुळे त्यानं त्याचा व्हिडिओ काढला. यानंतर या व्हिडिओच्या आधारे या पिल्लाचा परवा रात्रीपासून कसून शोध घेतला जातोय. वनविभागाचे अधिकारी कर्मचारी, एनजीओ, प्राणीमित्र संघटना असा मोठा फौजफाटा या बिबट्याच्या पिल्लाला शोधण्यासाठी मेहनत घेतोय. हे पिल्लू लवकर न शोधल्यास ते जिवंत मिळणे कठीण होऊन जाणार आहे.
ठसे आढळले, मात्र पिल्लू बेपत्ताच
या पिल्लाच्या पायांचे ठसे आढळले असले, तरी पिल्लू मात्र आढळून आलेलं नाही. परवा रात्रीपासून या पिल्लाच्या डोक्यात कॅन अडकल्यानं ते उपाशी आणि तहानलेलं असणार आहे. त्यामुळं त्याला लवकरात लवकर शोधण्याचं आव्हान वनविभागासमोर आहे. अशा जंगल असलेल्या भागात त्याला मदत कशी मिळणार, ही बाटली सहजासहजी निघणारी नसल्याने ती लवकरात लवकर काढणं गरजेचं आहे. त्यासाठी पिल्लाचा शोधही सुरू आहे. मात्र ते मिळून न आल्यास हे पिल्लू दगावण्याचीही शक्यता आहे.
पिल्लू सैरभैर
बदलापूरच्या गोरेगाव परिसरात वन्य प्राण्यांचा वावर दिसून येतो. इथे काही पर्यटक आणि स्थानिक फिरत असताना त्यांना ही घटना दिसली. पाण्याच्या शोधात हे बिबट्याचं पिल्लू फिरत असताना त्याला ही पाण्याची बाटली दिसली असावी. त्याने पाणी पिण्यासाठी तोंड लावलं असता ते त्यात अडकलं. आता हे पिल्लू सैरभैर फिरत आहे. दोन दिवसांपूर्वीची ही घटना आहे. वनविभाग या पिल्लाचा शोधही घेत आहे मात्र अद्याप ते सापडलं नाही.
पाणी पिता पिता बाटलीत अडकलं तोंड, बदलापुरातल्या ‘त्या’ बिबट्याच्या पिल्लाचा शोध सुरू#leopard #wild #thane #maharashtranews #ViralVideo #Trending
अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/ApGKcTtuxb— TV9 Marathi (@TV9Marathi) February 15, 2022
आणखी वाचा :