प्रतिनिधी, ठाणे : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह राहणे खूप सोपे झाले. बहुतेक तरुण सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहेत. त्यातल्या त्यात वेगवेगळ्या प्रकारचे रिल्स तयार करतात. आपल्या रिल्सला किती लोकांनी लाईक्स केले. किती जणांनी पाहिले. याचा मागोवा ते घेत असतात. त्यामुळे हटके रिल्स बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण, असाच हटके रिल्स बनवणे एका युवकाला चांगलेच महागात पडले. आक्षेपार्ह रिल्स बनवला. तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर त्याला थेट जेलची हवा खावी लागली.
सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कधी कोण काय करेल? याचा नेम नाही. उल्हासनगरमध्ये दुचाकीवर आंघोळ करत रिल्स बनवणं एका जोडीला महागात पडलं होतं. आता कल्याणात पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावर हत्यारं दाखवणं एका तरुणाला चांगलंचं भारी पडलं आहे.
तलवार, चॉपर दाखवत एका तरुणाने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओची दखल घेत कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू झाला. या युवकाला पोलिसांनी शोधून काढत अटक केली आहे.
प्रदीप गुलाबचंद यादव वय वर्ष 18 असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेतील सुचकनाका मुकादम चाळ येथे राहतो. प्रदीपला अटक करण्यात आली. त्यामुळे आता प्रदीपला जेलची हवा खावी लागली. गंमत म्हणून त्याने रिल्स बनवला. पण, आता ही गंमत त्याच्या जीवावर बेतली.
रिल्स तयार करताना आपण काय करतो, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा वापर हा दुधारी शस्त्रासारखा आहे. चांगले मॅसेज दिले जाऊ शकतात. तसेच प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह पोस्टही राहू शकते. प्रक्षोभक किंवा काही आक्षेपार्ह व्हायरल झाल्यास पोलीस कारवाई करतात. त्यामुळे सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करताना काळजी घेणे गरजेचे आहे.