Dombivali Crime : कोव्हिड सेंटरमधून पसार झालेला चोरटा 7 महिन्यांनी गजाआड

| Updated on: Dec 13, 2021 | 5:05 PM

उत्तर प्रदेशच्या मिरजापूर येथील राहणारा राजकुमार याचा मोबाईल लोकेशन पोलिसांनी ट्रॅक करण्याचे काम सुरू केलं. वारंवार त्याचं लोकेशन बदलत होते. अखेर 10 सप्टेंबर रोजी राजकुमार याचा फोन दादरा हवेली सिल्वासा येथे ट्रेस झाला. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले.

Dombivali Crime : कोव्हिड सेंटरमधून पसार झालेला चोरटा 7 महिन्यांनी गजाआड
कोव्हिड सेंटरमधून पसार झालेला चोरटा 7 महिन्यांनी गजाआड
Follow us on

डोंबिवली : कोव्हिड सेंटरमधून पसार झालेल्या आरोपीला 7 महिन्यानंतर अटक करण्यास डोंबिवली मानपाडा पोलिसांना यश आले आहे. राजकुमार बिंद असे या आरोपीचं नाव आहे. तो गेल्या काही महिन्यांपासून दादरा नगर हवेलीमध्ये काम करत होता. एका चोरीच्या प्रकरणात राजकुमारला अटक झाली होती. त्यानंतर त्याला कोरोना झाल्याने कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. तेथून तो पसार झाला होता.

सात महिन्यांपूर्वी चोरीच्या प्रकरणात राजकुमारला झाली होती अटक

डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मे महिन्यात राजकुमार बिंदला एका चोरीच्या प्रकरणात अटक केली होती. अटक केल्यानंतर त्याची कोविड चाचणी करण्यात आली. या चाचणीत राजकुमारचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. राजकुमारला उपचारासाठी कल्याण भिवंडी रोडवर असलेल्या टाटा आमंत्रा कोव्हिड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. राजकुमारवर नजर ठेवण्यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये मानपाडा पोलीस ठाण्याचे दोन पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. मात्र 10 मे रोजी राजकुमार या दोन्ही कर्मचाऱ्यांना चकवा देत संधी साधून पळून गेला होता. या प्रकरणी भिवंडी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच यावेळी ड्युटीवर तैनात आलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू होती.

मोबाईल लोकेशनमुळे आरोपी अटक

गेल्या 7 महिन्यांपासून राजकुमार पोलिसांच्या हाती लागत नव्हता. कल्याण डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी जे.डी. मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी राजकुमारचा शोध घेण्यासाठी एक पथक नेमले. पोलीस अधिकारी अविनाश वणवे यांच्या टीमला ही जबाबदारी सोपवण्यात आली. उत्तर प्रदेशच्या मिरजापूर येथील राहणारा राजकुमार याचा मोबाईल लोकेशन पोलिसांनी ट्रॅक करण्याचे काम सुरू केलं. वारंवार त्याचं लोकेशन बदलत होते. अखेर 10 सप्टेंबर रोजी राजकुमार याचा फोन दादरा हवेली सिल्वासा येथे ट्रेस झाला. पोलिसांचे पथक त्या ठिकाणी पोहचले. राजकुमार हा एका कंपनीत काम करत होता. अखेर त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (The thief who escaped from covid Center disappeared after 7 months)

इतर बातम्या

Pune Crime| कोट्यावधीच्या वक्फ जमीन मोबदला गैरव्यवहार प्रकरण ; न्यायालयाचा आरोपींना दिलासा नाहीच