अवकाळी पावसामुळे खदाणीत पाणी साचले होते, चिमुकल्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि मग…

| Updated on: May 03, 2023 | 7:49 PM

दोन मुलं मित्रांसोबत खदाणीत पोहायला गेली होती. संध्याकाळ झाली तरी मुलं घरी परतली नाही. यामुळे पालकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र मुलांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता.

अवकाळी पावसामुळे खदाणीत पाणी साचले होते, चिमुकल्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही आणि मग...
पोहायला गेलेली दोन मुलं खदाणीत बुडाली
Image Credit source: TV9
Follow us on

संजय भोईर, भिवंडी : अवकाळी पावसाने दगड खदाणीत साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना भिवंडी परिसरात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बुधवारी सकाळी खदाणीत मुलांचे मृतदेह तरंगताना दिसले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मित्रांसोबत खदाणीवर पोहायला गेले होते

अवकाळी पावसामुळे खदाणीत पाणी भरले आहे. या पाण्यात पोहण्याचा मोह मुलांना आवरला नाही. मंगळवारी दुपारी मयत दोन मुलं आपल्या इतर मुलांसह खदाणीत पोहण्यासाठी गेले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बुडाले. सायंकाळी 4 वाजले तरी मुलं घरी परतली नाही, म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. परंतु मुले कुठेच सापडली नाहीत. अखेर घरच्यांनी भोईवाडा पोलिसात मुलं हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलीसही मुलांचा शोध घेत होते.

हे सुद्धा वाचा