निनाद करमरकर, उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेत (Ulhasnagar corporation) यंदा मालमत्ता कराची तब्बल 550 कोटी रुपयांची थकबाकी अद्याप वसूल झालेली नाही. त्यामुळे महापालिकेचं आर्थिक गणित बिघडत असल्यानं महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) म्हटलं आहे. यंदा जे थेट मालमत्ता कर (Property tax) भरणार नाहीत त्यांना जप्तीचा इशारा आयुक्तांनी दिला आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून करबुडवल्याने पालिकेचं नियोजन बिघडत आहे.
उल्हासनगर महापालिकेत पूर्वीची 450 कोटी कर थकबाकी असून चालू वर्षातला 100 कोटी रुपये कर आहे. या कर वसुलीसाठी महापालिकेनं अभय योजना, व्याजमाफी या माध्यमातून आवाहन केलं आहे. मात्र कर बुडव्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं यंदा मागील 10 महिन्यात फक्त 35 कोटी रुपयांची वसुली होऊ शकली आहे.
उल्हासनगर महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत मालमत्ता कर हाच आहे. त्यामुळे कर थकबाकीमुळे महापालिकेचं आर्थिक गणित बिघडलं आहे. परिणामी यंदा थकबाकी वसूल झाली नाही, तर कर बुडव्यांच्या मालमत्ता जप्त करण्याचा इशारा उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजिझ शेख यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर तरी कर वसुली होते का? हे पाहावं लागणार आहे.