ठाणे : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार सोमवारपासून (7 जून) नेमकं काय सुरु, काय बंद असेल याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत (Unlock new guidelines in Thane District and city).
– दुकाने नियमित वेळेप्रमाणे सुरु राहणार
– मॉल, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, सिंगल स्क्रिन, नाट्य गृह 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
– रेस्टॉरंट आणि हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार
– लोकल ट्रेन – मेडिकल आणि अत्यावश्यक सेवेसाठी फक्त मुभा
– सार्वजनिक स्थळ आणि उद्याने सामान्य लोकांसाठी खुली असणार
– शासकीय आणि खाजगी कार्यालय 100 टक्के क्षमतेने सुरु राहणार
– इंडोर गेम ( खेळ) – सकाळी 5 ते 9 आणि संद्याकाळी 5 ते 9
-आउट डोअर गेम – हे पूर्ण दिवस सुरु करण्यासाठी मुभा
– शूटिंग – रेगुलर
– गॅदरिंग, सभा, बैठका आणि सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची मुभा
– लग्न समारंभ 50 टक्के क्षमता, जास्तीत जास्त 100 लोकांना परवानगी
– अंतयात्रा नेहमीप्रमाणे काढण्याची मुभा
– सर्व साधारण शासकीय सभा आणि बैठका 50 टक्के क्षमतेने आयोजित करण्याची मुभा
– बांधकाम व्यवसायासाठी (कंस्ट्रक्शन) दिवसभर मुभा
– शेती आणि त्याच्यावर अवलंबून उद्योगासाठी नेहमीप्रमाणे मुभा
– ई कॉमर्स आणि सर्व्हिसेस नेहमी प्रमाणे मुभा
– संचारबंदी उठवली आहे, जमवाबंदी पूर्वीसारखी असणार
– जिम, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, वेलनेस सेंटर – 50 टक्के क्षमतेने सुरु, मात्र नोंदणी करण्याची सक्ती
– सार्वजनिक वाहतूक – 100 टक्के क्षमतेने मात्र उभे राहून प्रवास करण्यास परवानगी नाही
– कार्को मॅनेज मॅनेजमेंट – 3 जण ( ड्राइवर, हेल्पर, क्लिनर ) यांना परवानगी
– अंतर जिल्हा प्रवासासाठी मुभा, मात्र लेव्हल 5 मध्ये जाण्यासाठी ई पास आवश्यक असणार
– बाहेर देशात निर्यात करणाऱ्या उद्योग कंपनींना पूर्वी सारखी काम करण्याची मुभा असणार (Unlock new guidelines in Thane District and city)
ठाणे जिल्ह्याती कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या भागातील नवे नियम :
1) सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
2) अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 पर्यंत सुरू राहतील.
3) मॉल्स/सिनेमागृहे (मल्टिप्लेक्ससह एकल स्क्रिन)/नाटयगृहे इत्यादी बंद राहतील.
4) रेस्टॉरंट्स सोमवार ते शुक्रवार ५०% बैठक क्षमतेने सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू राहतील. मात्र, सायं.४.०० वा.नंतर व शनिवारी आणि रविवारी फक्त टेक अवे/पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरू राहील.
5) उपनगरीय लोकल वाहतूकीबाबत बृहन्ममुंबई महानगरपालिकेने निर्गमित केलेले आदेश लागू राहतील..
6) सार्वजनिक ठिकाणे/खुली मैदाने/चालणे/ सायकलिंग दररोज सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा.पर्यंत सुरू राहतील.
7) खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. ४.०० वाजेपर्यंत (सुट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरू राहतील.
8) कार्यालयीन उपस्थिती- शासकीय कार्यालयांसह (खाजगी- जर परवानगी असेल) ५०% क्षमतेने सुरू राहतील.
9) क्रिडा- सकाळी ५.०० वा.पासून सकाळी ९.०० वा./ सायं.६.०० वा. पासून सायं.९.०० पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
10) चित्रीकरण Bubble च्या आतमध्ये सायं. ४.०० वा. पर्यंत सुरू ठेवता येईल व सायं.५.०० नंतर कोणासही हालचाल करता येणार नाही.
11) सामाजिक मेळावे / सांस्कृतिक / करमणूक ५०% बैठक क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं. ४.०० वा पर्यंत.सुरू राहतील.
12) लग्न समारंभ फक्त ५० लोकांच्या मर्यादेतच करता येतील.
13) अंत्यसंस्कार विधी फक्त २० लोकांच्या उपस्थितीमध्ये करता येईल.
14) बैठका/स्थानिक संस्थांच्या/ सहकारी संस्थांच्या निवडणूका हॉलच्या/सभागृहाच्या ५०% बैठक क्षमतेने घेणेस परवानगी राहील.
15) बांधकामाकरीता केवळ ऑनसाईट मजूर राहणाऱ्या ठिकाणी किंवा सायं.४.०० वा.पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी असेल.
16) कृषि सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सूरु राहतील.
17) ई-कॉमर्स- साहित्य व सेवा पूर्वीप्रमाणे नियमित सुरू राहतील.
18) जमावबंदी सांय. ५.०० वा. पर्यंत व संचारबंदी सायं ५.०० वा. नंतर लागू राहील.
19) व्यायामशाळा/केश कर्तनालय/ ब्युटी सेंटर्स/ स्पा/ वेलनेस सेंटर्स सायं. ४.०० पर्यंत ५०% क्षमतेने सुरु राहतील. परंतू, गि-हाईकांना पूर्वनियोजित वेळ ठरवूनच यावे लागेल. तसेच वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
20) सार्वजनिक परिवहन सेवा १००% बैठक क्षमतेने सुरू राहतील. परंतू, प्रवाश्यांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
21) मालवाहतूक जास्तीत जास्त ३ व्यक्तींसह (वाहन चालक/ हेल्पर/ स्वच्छक किंवा इतर असे ३ ) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
22) खासगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर ५ मधील कोणत्याही भागाकडे जात असल्यास किंवा त्यामधून जात असल्यास, प्रवाशाकडे ई-पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
23) उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरू राहतील.
24) उत्पादनाच्या अनुषंगाने :
a) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चे माल / पॅकेजिंगचे उत्पादन ___ करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठाच्या साखळीसह)
b) सर्व सतत प्रक्रिया सुरू असणारे उद्योग (ज्या युनिट्ससाठी अशा प्रकारच्या प्रक्रियेची आवश्यकता असते, ज्या अशा प्रकारच्या स्वरूपाच्या असतात ज्यांना त्वरित थांबवता येत नाही आणि पुरेश्या वेळेशिवाय ते पुन्हा सुरू होऊ शकत नाही)
c) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
d) अत्यावश्यक, गंभीर स्वरुपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता /आयटी सेवा नियमित सुरू राहतील.
25) उत्पादन सेक्टरमधील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहेत, असे युनिट केवळ ५०% कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. सोबतचे परिशिष्टातील अंमलबजावणी ठाणे जिल्हयातील मिरा-भाईंदर, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र, अंबरनाथ, कुळगांव-बदलापूर नगरपरिषद/ शहापूर, मुरबाड नगर पंचायत क्षेत्र व संपूर्ण ग्रामीण क्षेत्र या एकत्रित स्वतंत्र प्रशासकीय घटक क्षेत्रांमध्ये करणेची आहे. सदरचे आदेश दि.०७/०६/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा.पासून दि.१३/०६/२०२१ रोजी मध्यरात्री १२.०० वा.पर्यंत लागू राहतील.