मुंबई : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या घडामोडींमुळे प्रचंड चर्चेत आले आहे. कधी महाविकास आघाडी तर कधी शिवसेना, कधी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या राज्यातील राजकारण अर्थसंकल्पीय अधिवेशनापुढं घुटमळत असलं तरी नवे जुने आरोप प्रत्यारोप उखरून काढले जात आहेत. त्यामुळे आघाडीत बिघाडीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे महाविकास आघडी आणि वंचितच्या आघाडीची जोरदार चर्चा सुरु होत असतानाच वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसवर आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
त्यामुळे वंचितचे आणि राष्ट्रवादीचे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसून येत आहे. रोहित पवार यांनी वंचितवर टीका केल्याने पुणे निवडणुकीपासूनच ही शाब्दिक चकमक सुरू आहे.
वंचित महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जुना वाद्यावर टीका टिप्पणी केल्यामुळे राष्ट्रवादी आणि वंचितचा वाद वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ही भाजपला मदत करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली होती. त्यांच्या त्या टीकेनंतर आता वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी ही त्यांची जुनी टीका आहे असल्याचे म्हणत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पलटवार केला आहे.
रोहित पवार यांनी टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा पॉलिटिकल अजेंडा काय आहे हे आता नागालँडमधील भाजपसोबतच्या युतीमुळे समोर आले आहे.
त्यामुळे भाजपला मदत हे रोहित पवार यांचे काकाच करतात. त्यांनी भाजपसोबत किती युत्या केल्या आहेत. पहाटेचे शपथविधी कसे केले आहेत.
आणि आता नागालँड मधील राजकारणही पुढे आले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीवर आरोपर करण्यात काय अर्थ नाही तुमचा पॉलिटिकल अजेंडा मात्र जगासमोर आला आहे अशी टीका रेखाताई ठाकूर यांनी केली आहे.