कल्याण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शनिवारी राज्यभरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कल्याणच्या मोहने परिसरात शिवजयंती (Shivjayanti)निमित्त काही तरुणांनी रॅली काढली होती. या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी (Swords) नाचविल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणाचा तपास खडकपाडा पोलिसांनी सुरू केला आहे. या व्हिडिओच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी तपास सुरू करत या दोन तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जयदीप पाटील आणि हर्षद भंडारी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. (Video of two youths dancing with swords in Kalyan goes viral)
राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कल्याण-डोंबिवली शहरात देखील शिवजयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाईक रॅली, मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. शेकडो तरुण या रॅलीत सहभागी झाले होते. कल्याणजवळ असलेल्या मोहने परिसरात देखील सायंकाळच्या सुमारास शिवजयंती निमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. सर्व काही शांततेत सुरू असताना या रॅली दरम्यान दोन तरुणांनी हातात तलवारी घेऊन नाचवल्या.
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आणि स्वराज, निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या साहसी गिर्यारोहण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना एक अनोख्या आणि साहसी प्रकारे मानवंदना दिलेली शनिवारी पाहायला मिळाली. जुन्नर तालुक्यातील जीवधन किल्ल्यासमोर असलेला वानरलिंगी सुळखा ज्याची उंची सुमारे 480 फूट उंच आहे असा हा सुळखा केवळ 3 तासांच्या आत सर करून महाराजांना अनोखी आदरांजली वाहिली. किल्याची उंची जमिनीपासून सुमारे 3000 फूट उंच आहे त्यामुळे वानरलिंगी सुळखा तीन तासाच्या आत पोहचल्यानंतर सर्वप्रथम मानवंदना म्हणून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरतर्फे महाराजांची आरती करत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. (Video of two youths dancing with swords in Kalyan goes viral)
इतर बातम्या
कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल
Wardha Crime : संतापजनक घटना; दोन सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी