विरार : विरारमध्ये आज सकाळी एका शाळेच्या बसला भीषण आग लागण्याची घटना घडली. विरार पश्चिमेच्या विवा कॉलेज रस्त्यावर आज सकाळी 8 वाजता अचानक बसने पेट घेतला. शॉर्टसर्किट झाल्याने बसमध्ये आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. आगीत बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.
बस चालक व क्लिनरच्या सर्तकतेमुळे बसमधील शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मुलांना बाहेर काढल्यानंतर अगीचा भडका वाढला व त्यात बस जळून खाक झाली आहे.
परिसरात भितीचे वातावरण
वसई-विरार महापालिकेच्या अग्निशन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन आग आणखी वाढणार नाही याची काळजी घेतली. सकाळच्या वेळेत ही घटना घडल्याने परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.