कल्याण: कल्याणमध्ये एमएसआरडीचा अजब कारभार पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये एमएसआरडीएकडून अनेक ठिकाणी गटारे आणि फुटपाथ बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र, कोणत्याही नियोजनबद्धतीने हे काम सुरू नसल्याचं दिसत आहे. प्रत्येक चाळी, घरे आणि दुकानांसमोरून जाणारी ही गटारे उचंच उचं बांधण्यात आली आहेत. त्यामुळे घरे आणि दुकाने खाली गेल्याने दुकाने आणि चाळ्यांमध्ये पावसाळ्यात तुंबण्याची भीती वर्तवली जात आहे.
एमएसआरडीसीकडून कल्याणमध्ये गटर आणि फूटपाथचे काम सुरु आहे. आग्रा रोडवर हे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. गटारे आणि त्यांच्यावर बांधण्यात येणारे फूटपाथ त्यामुळे ही गटारे उंच झाली आहेत. त्या मुळे रस्ता खाली गेला आहे. इतकेच नव्हे तर रस्त्याच्या बाजूला असलेली दुकाने, सोसायट्या आणि चाळी खाली गेल्या आहेत. पावसाळ्यात चाळी, दुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरणार असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी एमएसआरडीसीला वारंवार तक्रार करुन देखील कोणताही प्रतिसाद मिळाले नाही, अशी प्रतिक्रिया व्यापारी राकेश मुथा यांनी दिली. गावठी कारभाराप्रमाणे गटारे बांधण्यात आल्याने घरात आणि दुकानात पाणी भरले जाणार असल्याने व्यापारी हवालदिल झाले असून त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
कल्याण पूर्वेकडील नांदिवली गावातही हीच परिस्थिती आहे. नांदिवलीतही सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ते मजबूत करण्यात आले आहेत. मात्र हे रस्ते खोदून ते बांधण्यात आले नाहीत. रस्त्यावरच भर टाकून रस्ते बांधण्यात आल्याने रस्ते उंच झाले आहेत. त्यामुळे येथील चाळ्या खोल गेल्या आहेत. पूर्वी चाळी आणि रस्ते समसमान पातळीवर होते. मात्र, वारंवार रस्ते तयार करताना त्यावर भर घालूनच रस्ते बांधण्यात आले. नंतर डांबरीकरण करण्यात आलं. काँक्रिटीकरण करतानाही तेच करण्यात आलं आहे, असं स्थानिक रहिवाशांचा म्हणणं आहे.
रस्ते उंच झाल्याने नांदिवलीतली स्टेट बँक ऑफ इंडिया ते होली क्रॉस शाळेपर्यंतच्या चाळ्यांमध्ये प्रत्येक पावसाळ्यात घरांमध्ये पाणी भरतं. आता रस्ते तर उंच झालेच पण या चाळ्यांसमोर भल्यामोठ्या गटार बांधण्यात आल्याने चाळी आणि खोल गेल्या आहेत. त्यामुळे आता चाळ्यांमध्ये प्रचंड पाणी भरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बाजूला असलेल्या चाळींच्या दुसऱ्या बाजूने इमारती आहेत. या ठिकाणी छोटा नाला असून तो वर्षानुवर्ष साफ केला जात नाही. त्यामुळे पाण्यचा निचरा होत नसल्याने चाळ्यांमध्ये पाणी तुंबत असतं. आता चाळीच्या तोंडावरच उंच गटारी बांधल्याने या चाळी पावसळ्यात पाण्यात राहतील, असं स्थानिकांचं म्हणणं आहे.
दुकानात पाणी साचणार नाही. यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येईल. योग्य ठिकाणी पाइप टाकण्यात येणार आहेत, असं मोघम उत्तर एमएसआरडीसीने दिलं आहे.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 3 January 2022https://t.co/nFEN1WEgD7#News | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 3, 2022
संबंधित बातम्या:
अंबरनाथमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; मित्रानेच केली मित्राची हत्या, आरोपीला अटक