Thane Water Supply : ठाणेकरांनो पाण्याचा जपून वापर करा, काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार

| Updated on: May 26, 2022 | 1:23 PM

तांत्रिक दु्रूस्तीचं काम झाल्यानंतर पुढचे दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी ठाणेकरांनी गरजे एवढ्या पाण्याचा साठा करावा असं आवाहन करण्यात आलंय, पावसाळापुर्वी राज्यातील अनेक भागात दुरूस्तीची कामे सुरू आहेत.

Thane Water Supply : ठाणेकरांनो पाण्याचा जपून वापर करा, काही भागात 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार
पाण्याचा जपून वापर करा
Image Credit source: twitter
Follow us on

ठाणे – ठाणे (Thane) शहरातील नौपाडा कोपरी (Naupada-kopri) प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रात असलेल्या धोबीघाट जलकुंभाची 300 मीमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी आहे. तिथं साईतीर्थ टॉवर आणि बारा बंगला सर्कल येथील धनेश्वर मंदिर येथे सॅटीस प्रकल्पाचे कामांतर्गत बाधीत होत असल्याने, स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. सदरचे काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवार दिनांक 27 मे, 2022 रोजी सकाळी 9 ते शनिवार दिनांक 28 मे, 2022 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) ठाणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच सहकार्य करावे असं देखील म्हटलं आहे.

या भागात पाणीपुरवठा बंद राहणार

ठाणे पुर्वेकडील संपुर्ण कोपरी परिसरातील सिध्दार्थ नगर, शांतीनगर, चंदणी कोळीवाडा, साईनगरी, साईनाथ नगर मस्ताननगर, ठाणेकर वाडी, कोपरी गाव, धोबीघाट, नातु परांजपे कॉलनी, स्टेशन परिसर, आदर्शनगर, सुदर्शन कॉलनी, आनंदनगर, गांधीनगर, कानेवाडी, सिध्दीविनायक नगर, केदारेश्वर नगर तसेच नवजीवन सोसायटी परिसर आदी परिसराचा पाणी पुरवठा वरील कालावधीत पुर्णपणे बंद राहणार आहे. त्यामुळे या नगरात राहणाऱ्या लोकांनी पाणी वापरताना काळजी घ्यावी. दुरूस्तीचे काम संपल्यानंतर हळूहळू पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

दुरूस्तीनंतर पाणीपुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता

तांत्रिक दु्रूस्तीचं काम झाल्यानंतर पुढचे दोन दिवस पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. तरी ठाणेकरांनी गरजे एवढ्या पाण्याचा साठा करावा असं आवाहन करण्यात आलंय, पावसाळापुर्वी राज्यातील अनेक भागात दुरूस्तीची कामे सुरू आहेत. कारण पावासाळा पुढच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता असल्याने गरजेची कामे पुर्ण केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

कारण पावसाळ्यात अशी कामं करणे कर्मचाऱ्य़ांना शक्य होत नाही.