एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची पत्रकार परिषद, सरकारमध्ये अडसर बनणार का?; वाचा काय काय म्हणाले?

| Updated on: Nov 27, 2024 | 4:58 PM

Eknath Shinde Press Conference : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून मोठी खलबतं होत आहे. शिंदे सेना आणि भाजपाचे शिलेदार आमने-सामने आले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आज त्यांची पत्रकार परिषद घेतली. काय म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री?

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून शेवटची पत्रकार परिषद, सरकारमध्ये अडसर बनणार का?; वाचा काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदे
Follow us on

राज्यात मुख्यमंत्री पदावरून गेल्या दोन दिवसांपासून सस्पेन्स वाढला होता. शिंदे सेनेचे शिलेदार आणि भाजपाचे मंडळी यांच्यात सीएम पदावरून एकवाक्यता दिसली नाही. दोन्ही गट त्यांच्या नेत्याला मुख्यमंत्री करण्यासाठी कसरत करताना दिसले. त्यांचे नाव रेटताना दिसले. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाने भाजपाला अगोदरच पाठिंबा जाहीर केल्याने राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदावरून तेढ निर्माण होत की काय, असे वातावरण तयार झाले होते. त्यातच आज एकनाथ शिंदे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही शेवटची पत्रकार परिषद होती. वाचा काय काय म्हणाले काळजीवाहू मुख्यमंत्री?

आम्ही काढले स्पीड ब्रेकर

महायुतीचं सरकार स्थापन करायचं आहे. महायुतीला मजबुतीने उभं करायचं आहे, असे ते म्हणाले. उद्या आमची बैठक आहे. तिन्ही पक्षाची दिल्लीत बैठक आहे. अमित शाह यांच्यासोबत होणार आहे. तिथे चर्चा होईल. त्यात निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काल मोदी आणि शाह यांच्याशी बोललो. सरकार बनवण्यात आमचा अडथळा नाही. तुम्ही निर्णय घ्याल तो मान्य आहे. आजही मी सांगितलं की वरिष्ठ निर्णय घेतील तो मान्य राहील, असे सांगत त्यांनी सस्पेन्स दूर केला. उद्या बैठकीत चर्चा होईल महायुतीच्या सरकारबाबत चर्चा होईल अशी माहिती त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

दिल्लीश्वराच्या निर्णयाला आमचा पाठिंबा

‘जीवन में असली उडान बाकी है अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन अभी तो सारा असमान बाकी है’, या शेर मधून त्यांनी पुढचं चित्र स्पष्ट केले. अजून खूप काम करायचं आहे. राज्याला विकासाकडे न्यायचं आहे. मोदींनी देशाचं नाव जगभर रोशन केलं. आज देश आत्मनिर्भर झाला आहे. आत्म सन्मान झाला आहे. आपले रिलेशन इतर देशांसोबत डेव्हलप झाले आहेत. त्याचा फायदा महाराष्ट्राला होईल. त्यामुळे कोणती कोंडी काही राहू नये हे सांगण्यासाठी बोलावलं आहे. त्यामुळे वरिष्ठ जे निर्णय घेतील, तो मान्य असेल. भाजपाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. आमची बैठक होणार आहे. भाजपाची बैठक होणार आहे. त्यात ते निर्णय घेतील. कोंडी, अडसर, नाराजी नाही आहे. स्पीड ब्रेकर नाही. नाराजी नाही. जो निर्णय भाजपचे दिल्लीतील नेते घेतील त्याला आमच्या शिवसेनेचा पाठिंबा आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे.