मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या हे दिवाळीनंतर घोटाळे बाहेर काढणार असल्याची धमकी देत आहेत. त्यांची धमकी पोकळ आहे. मीच अधिवेशनात भाजप नेत्यांची पोलखोल करणार आहे. त्यावेळी भाजप नेते तोंड लपवून फिरतील, असा दावा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे. किरीट सोमय्या घोटाळे उघड करण्याची पोकळ धमकी देत आहेत. आम्हाला काय धमक्या देताय. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. आगामी अधिवेशनात मीच भाजपचे पुराव्यानिशी घोटाळे उघड करणार आहे. मी असा भांडाफोड करणार आहे की भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना तोंड लपवून पळावे लागेल, असा दावा मलिक यांनी केला आहे. तसेच पिक्चर सुरू आहे. इंटरव्हल झाला आहे, असंही ते म्हणाले.
तुमच्याकडे इतका मोठा पसारा आहे. इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय आहे. सर्व काही आहे. तुम्ही सात वर्ष नवाब मलिकांबाबत खोदत आहात. अजून खोदा. पण मी काही केलंच नाही. तुम्ही करणार काय? असा सवाल त्यांनी केला. तसेच दलित व्यक्तीचा अधिकार हिरावणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी रामदास आठवले उभे राहत असतील तर हे दुर्दैव आहे, असं ते म्हणाले.
मी काल ट्विट केलेला फोटो हा जसमीन वानखेडे यांच्या पतीचा आहे. समीर वानखेडेचा हा मेव्हणा आहे. सध्या युरोपमधील व्हेनिसमध्ये तो राहतो. जसमीन वानखेडे यांच्या सोबत त्यांचा घटस्फोट झाला आहे. समीर वानखेडे यांनी धर्मांतर केले नाही कारण ते जन्मानेच मुस्लिम आहेत. त्यांच्या वडिलांनी धर्मांतर केले आहे, असा दावाही त्यांनी केला. वानखेडे कुटुंबाने 2015पासून आपली ओळख लपवली. फेसबूकवर दाऊद वानखेडे असं नाव होतं. त्यांनी ते बदलून डिके वानखेडे लिहिलं. नंतर ज्ञानदेव लिहिलं. मुस्लिम लोकांसमोर विषय गेला तर नोकरी धोक्यात येईल म्हणून नाव बदललं. यास्मिनचं जास्मीन केलं. दाऊदचा ज्ञानदेव झाला. जावई, सून सोबत राहिले तर अडचणीचं होऊ शकतं म्हणून त्यांनी घटस्फोट घेतला. मेव्हण्यालाही घटस्फोट दिला, असंही त्यांनी सांगितलं.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 31 October 2021 https://t.co/nNenqMxenk #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 31, 2021
संबंधित बातम्या:
1 नोव्हेंबरपासून बँकेच्या ‘या’ नियमांत होणार बदल, जाणून घ्या सर्वकाही
रत्नागिरीतील नौका समुद्रात बेपत्ता, सहा खलाशांसोबत पाच दिवसांपासून संपर्क नाही
पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; मजूर ढिगाऱ्याखाली दबले, 12 जण जखमी
(Will expose BJP leaders’ NCB extortion racket in Assembly, says Nawab Malik)