कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम 9 महिन्यांत पूर्ण करणार; एकनाथ शिंदेंनी केली पाहणी

| Updated on: Jul 20, 2021 | 9:05 PM

कोपरीच्या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गिकांचा वापर सुरू केला जाणार आहे.

कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम 9 महिन्यांत पूर्ण करणार; एकनाथ शिंदेंनी केली पाहणी
कोपरी पुलाच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम 9 महिन्यांत पूर्ण करणार
Follow us on

ठाणे : पूर्व द्रुतगती मार्गावरील कोपरी येथील रेल्वे ओव्हरब्रिजच्या मधल्या दोन मार्गिकांचे काम पुढील नऊ महिन्यांत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही एमएमआरडीए आणि रेल्वेने दिली आहे. या ग्वाहीनंतर या पुलासाठी लागणारे गर्डर आणि बीम तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बोईसर येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. (Work on the two lanes in the middle of the corner bridge will be completed in 9 months; Survey by Eknath Shinde)

रेल्वे ओव्हरब्रिजच्या कामाची दोन वर्षांपासून रखडपट्टी

कोपरीच्या रेल्वे ओव्हरब्रिजचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. अप्रोच रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या मार्गिकांचा वापर सुरू केला जाणार आहे. मात्र मधल्या दोन मार्गिकांचे काम नक्की कसे हाती घ्यावे, याबाबत संदिग्धता होती. वाहतुकीचा भार पाहता या मार्गिकांचे काम दोन टप्प्यात पूर्ण करावे किंवा कसे याबाबत चर्चा सुरू होती. याचदरम्यान आता एमएमआरडीए व रेल्वेने नऊ महिन्यांत काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे.

गर्डरच्या कामाची पाहणी

एकनाथ शिंदे यांनी बोईसर येथील साई प्रोजेक्स्ट्स कंपनीच्या वर्कशॉपला भेट दिली. पुलासाठी वापरण्यात येणारे भक्कम गर्डर व देशात पहिल्यांदाच वापरण्यात येणाऱ्या पूर्ण स्टीलच्या बीमच्या कामाची पाहणी त्यांनी केली. हे सर्व काम पूर्ण झाल्यामुळे हे साहित्य तातडीने ठाण्याला हलवण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. पहिल्या दोन मार्गिका सुरू होताच मधल्या दोन मार्गिकांचे काम हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

ठाण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा पूल

ठाण्याच्या वाहतुकीच्या दृष्टीने हा पूल लवकरात लवकर पूर्ण होऊन सुरू होणे गरजेचे आहे. त्याच अनुषन्गाने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी केली. पहिल्या दोन मार्गिका सुरू झाल्यावर लगेचच उर्वरित दोन मार्गिकांचे कामही हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे थोडी गैरसोय झाली तरीही येत्या नऊ महिन्यांत पूर्ण पूल तयार करून वापरता येणे शक्य होणार आहे. त्यामुळेच या दोन्ही मार्गिकांचे काम एकत्रच सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी ठाण्याचे खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक आणि एमएमआरडीए व मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (Work on the two lanes in the middle of the corner bridge will be completed in 9 months; Survey by Eknath Shinde)

इतर बातम्या

दी म्युनिसिपल को. ऑपरेटिव्ह बँकेत कोणत्याही पदासाठी भरती नाही, सोशल मीडियावर फिरणारा मेसेज खोटा

20 मीटर उंच, 125 मेट्रिक टन साठवणूक क्षमता, नागपुरात देशातील सर्वात मोठा ऑक्सिजन टॅंक