मुरबाड : तरुणांनी गंमत म्हणून तयार केलेल्या व्हिडिओनंतर तीन रिक्षाचालकांनी या तरुणांना बेदम मारहाण(Beaten) केल्याची घटना मुरबाड शहरात घडली आहे. याप्रकरणी मुरबाड पोलिसांनी मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मुरबाड शहरातील नमस्कार हॉलमध्ये महिनाभरापूर्वी एक कपड्यांचा सेल(Sale) लागला होता. या सेलमध्ये काही तरुणांनी गंमत म्हणून एक व्हिडीओ(Video) तयार केला होता. वास्तविक पाहता या व्हिडिओत काहीही आक्षेपार्ह नसताना तब्बल महिनाभरानंतर मुरबाडच्या रिक्षास्टॅंडवर दादागिरी करणाऱ्या कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांनी संबंधित तरुणांना बसस्टँड परिसरात बोलावून घेतलं. तिथे तुम्ही तयार केलेल्या व्हिडिओतून महिलांची छेड काढल्याचा दावा करत या तिघांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या चार तरुणांना बेल्ट, दांडका आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. इतकंच नव्हे तर या मुलांना कान धरून उठाबशा काढायला लावल्या. (Youngsters beaten up for making funny videos in Murbad)
तीन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ शूट करून तो या तीन गुंड रिक्षाचालकांनी व्हायरल केला. दुसरीकडे ज्या तरुणांना मारहाण करण्यात आली होती, ते तरुण मात्र घाबरून घरीच बसले. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुरबाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी या तरुणांना शोधून काढलं आणि त्यांना विश्वासात घेत तक्रार द्यायला लावली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुंड रिक्षाचालक कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे या तिघांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या.
दरम्यान, कचरू टेकडे, विठ्ठल टेकडे आणि विशाल टेकडे हे तीन रिक्षाचालक गुंड प्रवृत्तीचे असून मुरबाड बसस्टँड परिसरात ते नेहमीच दादागिरी करत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शिवाय ज्या व्हिडीओवरून या तिघांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या तरुणांना मारहाण केली, त्या व्हिडीओत दिसणाऱ्या महिलांशी या तिघांचा कोणताही संबंध नसल्याचं सुद्धा समोर आलंय. त्यामुळं निव्वळ दहशत माजवण्यासाठी निष्पाप मुलांवर दादागिरी करणाऱ्यांना वेळीच धडा शिकवण्याची आवश्यकता आहे. (Youngsters beaten up for making funny videos in Murbad)
इतर बातम्या
Satara Crime : साताऱ्यात 15 हजारांसाठी विकली दीड वर्षाची मुलगी? खाजगी सावकारीच्या संशयातून तपास सुरु
Wardha : कदम डॉक्टरच्या घरातील ‘त्या’ खोलीत आढळला कुबेराचा खजिना, तब्बल 97 लाख 42 हजार हस्तगत