डोंबिवली : मोठा गाजावाजा करीत कल्याण डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीमेचा पुरता फज्जा उडालाय. कामचुकार ठेकेदाराकडून शून्य कचरा मोहिमेला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. सर्वत्र रस्त्यावर कचरा पसरला आहे. नागरिक हैराण आहेत. विशेष म्हणजे या कचरा उचलण्याचे काम ज्या ठेकेदाराचे आहे त्या ठेकेदाराला पालिकेने अनेकदा नोटीस देऊनही तो जुमानत नसल्याची कबुलीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या कामचुकार ठेकेदारविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. (Zero waste campaign in Kalyan-Dombivali, citizens harassed due to garbage)
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात डोकेदुखी ठरलेली कचरा समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने विविध उपाययोजना केल्या. उंबर्डे, बारावे या ठिकाणी कचराविघटन प्रकल्प सुरू करत आधारवाडी डम्पिंग बंद केले. ओला सुका कचरा वर्गीकरण, कचराकुंडी हटाव मोहीम अशा विविध उपाय योजना राबवल्या. काही अंशी पालिकेच्या प्रयत्नांना यश आलं. मात्र पालिकेच्या या प्रयत्नांना काम चुकार ठेकेदारामुळे खीळ बसत असल्याचे दिसून येतेय. महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील 2 प्रभागामधील कचरा उचलण्याचे काम ठेकेदाराला देण्यात आलंय.
संबंधित ठेकेदाराच्या कामचुकारपणामुळे अनेकदा या प्रभागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी कचरा गाड्या बंद अवस्थेत पडून असून त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तर खडकपाडा येथील पालिकेच्या पार्किंगच्या जागेत या ठेकेदाराच्या 15 ते 20 गाड्या भंगार अवस्थेत पडून आहेत. त्याहून धक्कादायक बाब या सर्व गाड्या कचऱ्याने खचाखच भरलेल्या आहेत. तर या ठेकेदाराला अनेकदा नोटिसा पाठवून देखील ठेकेदार जुमानत नसल्याची कबुली दस्तुरखुद्द पालिकेने दिली. त्यामुळे पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला ठेकेदारामुळे खीळ बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Zero waste campaign in Kalyan-Dombivali, citizens harassed due to garbage)
Know This : Mumbai Vadapav चा जन्म कसा झाला? Ashok Vaidya यांच्या वडापावची कहाणी#KnowThis #Vadapav #MumbaiVadaPav #HistoryofVadapav pic.twitter.com/TL8XSSEV9W
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2021
इतर बातम्या
लाचखोरी प्रकरणात शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचं अखेर निलंबन, तर कोर्टाकडून अटी-शर्तींसह जामीन