दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : लोकसभा निवडणूक प्रक्रियेला जवळपास दोन वर्षे बाकी आहे, मात्र त्यापूर्वीच भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत प्रक्रियेत भाजपने नेहमीच अग्रस्थानी असल्याचे दिसून आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच भाजपने लोकसभा निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारांची निश्चिती नसली तरी दुसरीकडे प्रचाराचा शुभारंभ भाजप नवीन वर्षात करणार आहे. त्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. निवडणुकीचे रणशिंग फुंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी केली आहे. औरंगाबाद शहरात हा लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. यासाठी नवीन वर्षातील 2 जानेवारी ही तारीखही निश्चित करण्यात आली आहे. सायंकाळी ही सभा पाच वाजता होणार आहे. भाजपचे जिल्हा अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी ही माहिती दिली आहे.
लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी असतांना भाजपने प्रचार सुरू केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
याच दरम्यान उमेदवार नसतांना भाजप उमेदवार घोषित करण्याची शक्यता असल्याने भाजपच्या या जाहीर सभेकडे अनेकांचे लक्ष लागून आहे.
औरंगाबाद शहरात 2 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा औरंगाबादमध्ये नारळ फोडणार आहे.
औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर लोकसभा निवडणुकीचा नारळ फुटणार असल्याने भाजपमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासह केंद्रीय मंत्री, राज्यातील पदाधिकारी या जाहीर सभेच्या दृष्टीने तयारी करत आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील तयारीला लागले आहे.
दोन वर्षे बाकी असतांना प्रचाराचा नवा फंडा भाजपकडून राबविला जात असल्याने भाजपच्या रणनीतीवर राजकीय चर्चा होऊ लागली आहे.