बसमधून धावताना भारी वाटत असेल… पण तुमच्या खिशावर कुणाचा डोळा आहे, माहितीय का?

| Updated on: Feb 08, 2023 | 1:15 PM

नाशिक शहरातील बस सेवा देणाऱ्या सिटी लिंक कंपनीने अर्थ संकल्पांत काही कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केल्यानं खळबळ उडाली आहे.

बसमधून धावताना भारी वाटत असेल... पण तुमच्या खिशावर कुणाचा डोळा आहे, माहितीय का?
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : गेल्या काही वर्षांपूर्वी नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) माध्यमातून शहरात नव्या बस दाखल झालेल्या आहेत. नाशिक महानगर पालिका परिवहन मंडल लिमिटेड ( Nashik City Linc) या कंपनीच्या माध्यमातून ही बस सेवा पुरवली जात आहे. आणि हीच बससेवा सध्या तोट्यात सुरू आहे. शहरातील नागरिकांना ( Nashik News ) सार्वजनिक वाहतुक सेवा देण्यासाठी पालिकेने नव्या बस सेवेचा शुभारंभ केला आहे. पुण्याच्या धर्तीवर ही सेवा नाशिक शहरात सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये सीएनजी बसचा देखील समावेश आहे. मात्र, हीच बससेवा सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नाशिक शहरात दररोज शेकडो बस सिटी लिंकच्या माध्यामातून धावत आहे. या बस सध्या तोट्यात सुरू आहे. साधारणपणे प्रतिकिलोमीटर 75 रुपये खर्च होत असून तिकीट मात्र 45 रुपये इतकेच आहे.

नाशिक महानगर पालिकेचीच सिटी लिंक कंपनीने येणाऱ्या वर्षातील अर्थसंकल्पात 85 कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे शहर बससेवेचा बोजा पालिकेच्या तिजोरीवर येणार आहे.

हे सुद्धा वाचा

काही दिवसांतच नाशिक महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामध्ये महानगर पालिकेची शहर बस सेवा देणाऱ्या सिटी लिंकच्यासाथी 85 कोटी रुपयांची तरतूद होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी पालिका एकतर तिकट वाढविण्याची शक्यता नाकारता येत नाही, याशिवाय बसचे जे पास होते त्यामध्येही वाढ करण्यात आली होती. याशिवाय पालिका आपल्या तिजोरीतून पैसे देऊ शकते.

त्यामुळे साहजिकच सर्वसामान्य नागरिकांनी कराच्या रूपात पालिकेला दिलेला पैसा सिटी लिंक कंपनीला दिला जाईल किंवा तिकटाच्या माध्यमातून नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

नाशिक शहरात जवळपास अडीचशेहून अधिक बस धावत आहे. याशिवाय शहरात लवकरच इलेक्ट्रिक बस सुद्धा दाखल होणार आहे. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ताण येणार नाही यासाठी पालिकेचा प्रयत्न सुरू आहे.

मात्र, दुसरिकडे सिटी लिंक बस तोट्यात सुरू असतांना तिला आर्थिक ताकद देण्यासाठी पालिका येणाऱ्या अर्थसंकल्पात तरतूद करू शकते किंवा दुसरीकडे टिकटाचे दर वाढू शकते.

दोन्ही बाजूने सर्वसामान्य नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे आर्थिक फटका नाशिककरांना नव्या वर्षात बसणार हे निश्चित आहे. त्यामुळे पालिकेच्या बससेवेवरुन पुन्हा नवा वाद उभा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीही नाशिक शहरात सुरू असलेली बससेवा कामगारांच्या काम बंद आंदोलनामुळे चर्चेत आली आहे. त्यामुळे येत्या काळात सिटी लिंकबाबत काय निर्णय होतो याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.