सांगली : द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याने (Farmer) थेट अधिकाऱ्याचे (Officers) पाय धरत अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. त्यामुळे अधिकारी ही काळ भांबावले. शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आर्त टाहोमुळे वातावरण एकदम सून्न झाले होते. हा प्रकार नेमका काय आहे, ते पाहुयात..
सांगली जिल्ह्यातील भोसे जाधव वस्तीवरील शेतकऱ्यांना आपबित्ती सांगताना आश्रू अनावर झाले. स्टोन क्रशरच्या धुळीमुळे त्यांचे हात तोंडाशी आलेले पीक वाया जात आहे. काहींना तर द्राक्ष बागेवर कुऱ्हाड चालवावी लागली आहे.
याविषयीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी प्रदूषण महामंडळाचे अधिकारी शेतात पोहचले. तेव्हा पीडित शेतकऱ्यांनी त्यांची आपबित्ती मांडली. तेव्हा शेतकऱ्यांना आश्रू अनावर झाले.
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांनी स्टोन क्रशर हटविण्याची मागणी केली. गेल्या तीन चार वर्षांपासून शेतकरी क्रेशर बंद करण्याची मागणी करत असताना त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदूषण विभाग खाडकन जागा झाला.
प्रदूषण विभागाचे अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाहणी केली. त्यावेळी एका शेतकऱ्याने थेट अधिकाऱ्याचे पायच धरले आणि जीवाचं बरं वाईट करण्याचा इशारा दिला. तर महिलांनी आक्रोश केला.
भोसे येथील स्टोन क्रशरच्या धुळीमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. धूळ बसल्याने पिकांचे प्रकाश संश्लेषण होत नसल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.
दरम्यान प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शेती आणि स्टोन क्रशरचा पंचनामा केला. त्यात स्टोन क्रशरच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले. याविषयीचा अहवाल तयार करुन तो पुढे पाठविला जाईल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
श्लोक हायटेक स्टोश क्रशरमुळे गेल्या चार वर्षांपासून नुकसान होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिसरातील 85 एकर शेतीचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
जवळपास 200 ते 225 शेतकऱ्यांच्या शेतातील कडधान्य, द्राक्ष बाग, भाजीपाला मातीमोल झाला आहे. प्रशासन दखल घेत नसल्याच्या नाराजीने शेतकऱ्यांनी यासंबंधीचा व्हिडिओ काढला होता.